एक्स्प्लोर

Gram Panchayat Election Result : गावगाड्यात एकच चर्चा, कुणाचा पॅनल बसणार! निकालाची प्रतीक्षा

Gram Panchayat Election Result : राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाची आता लाखो उमेदवारांसह नागरिकांना प्रतीक्षा आहे. या निवडणुकीसाठी प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 79 टक्के मतदान झाले आहे.

मुंबई : राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाची आता लाखो उमेदवारांसह नागरिकांना प्रतीक्षा आहे. या निवडणुकीसाठी प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 79 टक्के मतदान झाले. मतमोजणीला साधारण 10 वाजेपासून सुरुवात होईल. सायंकाळी 5 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे. दरम्यान मतमोजणीसाठी जिल्हाधिकारी स्तरावरुन काही मनाई आदेश आणि महत्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या मतमोजणीसाठी तालुक्याच्या ठिकाणी प्रशासन सज्ज झालं आहे.

राज्यातील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा 11 डिसेंबर 2020 रोजी करण्यात आली होती. त्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अशंत: बिनविरोध झाल्या आहेत.  गडचिरोली जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील 162 ग्रामपंचायतींसाठी 20 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. विविध कारणांमुळे 15 तारखेला प्रत्यक्षात 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. गडचिरोली जिल्ह्यात 22 जानेवारी 2021 रोजी; तर अन्य सर्व जिल्ह्यांत 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होईल.

मतमोजणीच्या ठिकाणी या गोष्टींना मनाई

मतमोजणीच्या संपूर्ण परिसरात शासकीय अधिकारी आणि कर्मचारी वगळता इतर कोणत्याही व्यक्तींना मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. सोबत तंबाखूजन्य पदार्थ, आगपेटी, लायटर, ज्वालाग्राही पदार्थ अथवा कोणतेही घातक पदार्थ किंवा वस्तू मतमोजणीच्या ठिकाणी घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्राच्या परिसरात निवडणूक संबंधित अधिकारी, कर्मचारी, उमेदवार, उमेदवारांचे दोन अधिकृत प्रतिनिधी आणि पासधारक व्यक्ती यांच्या शिवाय कोणालाही प्रवेश करण्यास परवानगी नसणार आहे.

Maharashtra Gram Panchayat Elections 2021 LIVE Updates: ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा!

15 तारखेला मतदान झालेल्या ग्रामपंचायतींच्या 1 लाख 25 हजार 709 जागांसाठी एकूण 3 लाख 56 हजार 221 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. छाननी आणि माघारीनंतर 2 लाख 41 हजार 598 उमेदवार शिल्लक होते. त्यापैकी 26 हजार 718 उमेदवार बिनिविरोध विजयी घोषित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अंतिमत: 2 लाख 14 हजार 880 उमेदवार आज प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात होते. त्यासाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळत मतदान झाले.

Gram Panchayat Election : ग्रामपंचायतींसाठी उत्साहात मतदान, आता लक्ष सोमवारच्या निकालाकडे

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 143, पालघर- 3, रायगड- 78, रत्नागिरी- 360, सिंधुदुर्ग- 66, नाशिक- 565, धुळे- 182, जळगाव- 687, नंदुरबार- 64, अहमनगर- 705, पुणे- 649, सोलापूर- 593, सातारा- 652, सांगली- 142, कोल्हापूर- 386, औरंगाबाद- 579, बीड- 111, नांदेड- 1013, परभणी- 498, उस्मानाबाद- 382, जालना- 446, लातूर- 383, हिंगोली- 421, अमरावती- 537, अकोला- 214, यवतमाळ- 925, वाशीम- 152, बुलडाणा- 498, नागपूर- 127, वर्धा- 50, चंद्रपूर- 604, भंडारा- 145, गोंदिया- 181 आणि गडचिरोली- 170. एकूण- 12,711.

ग्रामपंयात निवडणूक एक दृष्टिक्षेप • निवडणूक जाहीर ग्रामपंचायती- 14,234 • प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती- 12,711 • एकूण प्रभाग- 46,921 • एकूण जागा- 1,25,709 • प्राप्त उमेदवारी अर्ज- 3,56,221 • अवैध नामनिर्देशनपत्र- 6,024 • वैध नामनिर्देशनपत्र- 3,50,197 • मागे घेतलेली नामनिर्देशनपत्र- 97,719 • बिनविरोध विजयी होणारे उमेदवार- 26,718 • अंतिम निवडणूक रिंगणातील उमेदवार- 2,14,880

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

42 षटकार, 37 चौकार, 40 षटकात 523 धावांचा पाऊस; पंजाबनं कोलकात्याला 8 विकेटनं लोळवलं
42 षटकार, 37 चौकार, 40 षटकात 523 धावांचा पाऊस; पंजाबनं कोलकात्याला 8 विकेटनं लोळवलं
Mahayuti Seat Sharing In Maharashtra : पुढील 24 तासात महायुतीच्या उर्वरित सर्व जागांची घोषणा होणार; ठाणे, नाशिक अखेर कोणाच्या वाट्याला?
पुढील 24 तासात महायुतीच्या उर्वरित जागांची घोषणा होणार; ठाणे, नाशिक अखेर कोणाच्या वाट्याला?
ठाण्यात आयपीएलवर सट्टेबाजी, छत्तीसगडच्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
ठाण्यात आयपीएलवर सट्टेबाजी, छत्तीसगडच्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
EVM : ठाण्यात ईव्हीएम सापडले; जितेंद्र आव्हाडांच्या टीकेनंतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा खुलासा
ठाण्यात ईव्हीएम सापडले; जितेंद्र आव्हाडांच्या टीकेनंतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा खुलासा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Superfast News : विदर्भात Heat, मतदार Superhit हिंगोली : लोकसभेच्या वेगवान बातम्या : 26 April 2024Sushma Andhare on piyush Goyal : सुषमा अंधारेंची पियुष गोयल यांच्यावर टीका ABP MajhaPankaja Munde and Dhananjay Munde Beed :पदर पसरते, मतांची भीक द्या! मुंडे बंधू बघिणीची मतदारांना सादSupreme Court  : ईव्हीएम, व्हीव्हीपॅट संदर्भातील सर्व याचिका कोर्टानं फेटाळल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
42 षटकार, 37 चौकार, 40 षटकात 523 धावांचा पाऊस; पंजाबनं कोलकात्याला 8 विकेटनं लोळवलं
42 षटकार, 37 चौकार, 40 षटकात 523 धावांचा पाऊस; पंजाबनं कोलकात्याला 8 विकेटनं लोळवलं
Mahayuti Seat Sharing In Maharashtra : पुढील 24 तासात महायुतीच्या उर्वरित सर्व जागांची घोषणा होणार; ठाणे, नाशिक अखेर कोणाच्या वाट्याला?
पुढील 24 तासात महायुतीच्या उर्वरित जागांची घोषणा होणार; ठाणे, नाशिक अखेर कोणाच्या वाट्याला?
ठाण्यात आयपीएलवर सट्टेबाजी, छत्तीसगडच्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
ठाण्यात आयपीएलवर सट्टेबाजी, छत्तीसगडच्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
EVM : ठाण्यात ईव्हीएम सापडले; जितेंद्र आव्हाडांच्या टीकेनंतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा खुलासा
ठाण्यात ईव्हीएम सापडले; जितेंद्र आव्हाडांच्या टीकेनंतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा खुलासा
''अमित शाह, तुम्ही ज्या शाळेत शिकत आहात, त्या शाळेचा मी हेडमास्टर''; राऊतांचे घणाघाती बाण
''अमित शाह, तुम्ही ज्या शाळेत शिकत आहात, त्या शाळेचा मी हेडमास्टर''; राऊतांचे घणाघाती बाण
ABP Majha Impact : निवडणूक अधिकाऱ्यांनी जेवणासाठी 25 मिनिटे मतदान थांबवलं, यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांना नोटिस जारी
निवडणूक अधिकाऱ्यांनी जेवणासाठी 25 मिनिटे मतदान थांबवलं, यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांना नोटिस जारी
नारायण-सॉल्टनं पंजाबला धू धू धुतलं, कोलकात्याची 261 धावांपर्यंत मजल
नारायण-सॉल्टनं पंजाबला धू धू धुतलं, कोलकात्याची 261 धावांपर्यंत मजल
''कोण बी उठतंय बोगद्याचा दरवाजा उघडतंय''; मोहिते पाटलांचं गावरान भाषण, सांगितला पवार भेटीचा किस्सा
''कोण बी उठतंय बोगद्याचा दरवाजा उघडतंय''; मोहिते पाटलांचं गावरान भाषण, सांगितला पवार भेटीचा किस्सा
Embed widget