एक्स्प्लोर

पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या चार जागांसाठी मतदान, निकाल गुरुवारी

विधानपरिषदेच्या चार जागांसाठी मतदान झालं आहे. पण याही निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी लक्ष घातल्यामुळे सगळ्यांचं लक्ष या निवडणुकीकडे लागून आहे. या निवडणुकीचा निकाल 28 जूनला जाहीर होईल.

मुंबई : विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या चार जागांसाठी आज मतदान झालं . यात मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदार संघाचा समावेश आहे. मुंबई पदवीधर मतदार संघात 53.23 टक्के, तर मुंबई शिक्षक मतदार संघात 83.26 टक्के मतदानाची नोंद झाली. कोकण पदवीधर मतदारसंघात 73.89 टक्के  तर नाशिक शिक्षक मतदार संघात 92.30 मतदान झालं. LIVE UPDATE : - कोकण पदवीधर निवडणूक - गद्दारला धडा शिकवणार, मतदार नोंदणी करायला मला वेळ मिळाला नाही, पण आमचा विजय होणार - नजीब मुल्ला - मोठ्या मताधिक्याने निवडून येईन, प्रचार करताना कुठेही जाणवलं नाही की भाजपमध्ये माझ्याविरोधात नाराजी आहे - निरंजन डावखरे - नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणूक : बीडी भालेकर मतदान केंद्राबाहेर शिवसेना उमेदवार दराडे समर्थक आणि संदीप बेडसे समर्थकांमध्ये हाणामारी, शिवसेनेने माघार घेतल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या आरोपातून हाणामारी झाल्याची माहिती कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक विधान परिषदेच्या चार जागांवर निवडणूक होत असताना सगळ्यात चुरशीची असलेली निवडणूक म्हणजे कोकण पदवीधर मतदारसंघांची निवडणूक. राष्ट्रवादी काँग्रेसचे निरंजन डावखरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची गोची झाली. त्यामुळे गद्दाराला धडा शिकवा या भावनेने राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरली आहे. स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी मुंबईत सभा घेतली होती. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निरंजन डावखरे यांना पक्षात आणल्याने भाजपसाठी निवडणूक प्रतिष्ठेची आहे. शिवसेनाही या निवडणुकीत तयारीनिशी उतरली आहे. कोकण पदवीधरसाठी पक्ष आणि उमेदवार भाजप : निरंजन डावखरे राष्ट्रवादी काँग्रेस : नजीब मुल्ला शिवसेना : संजय मोरे एकूण मतदार : एक लाख चार हजार ठाणे : 45 हजार पालघर : 16 हजार सिंधुदुर्ग : 5308 रत्नागिरी : 16 हजार रायगड : 19 हजार गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या मदतीमुळे भाजपच्या उमेदवाराला पाडून राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे निवडून आले होते. यावेळी शिवसेना आणि भाजप दोन्ही उमेदवार रिंगणात आहे. निरंजन डावखरे बाहेरुन पक्षात आल्यावर मिळालेल्या उमेदवारीमुळे भाजप पक्षात नाराजी आहे. राष्ट्रवादीला तयारीला वेळ मिळाला नाही. तरी कोकण पदवीधरमध्ये गद्दाराला धडा शिकवायचा या भावनेने राष्ट्रवादी उतरली आहे. त्यामुळे निरंजन डावखरेंसमोर आव्हान आहे. भाजपचा उमेदवार येऊ द्यायचा नाही यासाठी कोणती समीकरणं जुळतील, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन क्रमांकाची पसंतीची मतं कुणाला मिळणार यावर या निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांची मैत्रीही सर्वश्रूत आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूक कोकणसोबतच मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूकही आज होत आहे. यावर्षी शिवसेना, भाजप आणि इतर पक्षाने ताकद पणाला लावल्यामुळे या निवडणुकाही चुरशीच्या झाल्या आहेत. मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळातील इतर सर्वच मंत्र्यांनी या निवडणुकीसाठी मेहनत घेतली आहे. मुंबई पदवीधर मतदार संघ - पक्ष आणि उमेदवार भाजप : अॅड. अमितकुमार मेहता शिवसेना : विलास पोतनीस लोकभारती : जालिंदर सरोदे अपक्ष ( मनसे स्वाभिमानी पुरस्कृत) : राजू बंडगर अपक्ष : डॉ. दीपक पवार एकूण मतदार : 70 हजार मुंबई उपनगर : 52 हजार मतदार शहर : 18 हजार मतदार गेल्यावेळी शिवसेनेचे डॉ. दीपक सावंत याच मतदारसंघातून 13 हजार मतांनी निवडून आले होते. दीपक सावंत हे युतीचे मतदार होते. पण यावेळी शिवसेना आणि भाजप दोघांनी आपले स्वतंत्र उमेदवार उतरवले आहेत. आधी आदित्य ठाकरे यांनी तरुण उमेदवार देऊ अशी घोषणा केली होती आणि ज्येष्ठ शिवसैनिक विलास पोतनीस यांना नंतर संधी दिली. यावरुन नारायण राणे यांच्या स्वाभिमानी पक्षाने टीका केली. मुंबई शिक्षक मतदारसंघ मुंबई शिक्षक मतदारसंघ हा गड लोकभारतीचे कपिल पाटील यांनी राखून ठेवला आहे. यावर्षी निवडणुकीत शिवसेना आणि भाजप ताकद लावत आहेत. शिवसेनेने या निवडणुकीसाठी पाकिटं वाटल्याचा तसेच बंगल्यावर बोलवून शाळा संस्थाचालकांची बैठक घेतल्याचा आरोप केला कपिल पाटील यांनी केला होता. मुंबई शिक्षक मतदारसंघ : पक्ष आणि उमेदवार शिवसेना : शिवाजी शेंडगे लोकभारती : कपिल पाटील अपक्ष (भाजप पुरस्कृत) : अनिल देशमुख एकूण मतदार : 10 हजार 169 मुंबई उपनगर : 8273 मुंबई शहर : 1896 विधानपरिषदेच्या चार जागांसाठी मतदान होत आहे. पण याही निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी लक्ष घातल्यामुळे सगळ्यांचं लक्ष या निवडणुकीकडे लागून आहे. शिवाय नाशिक शिक्षक मतदारसंघासाठीही आजच निवडणूक होत आहे. या निवडणुकीचा निकाल 28 जूनला जाहीर होईल. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार नाशिक शिक्षक मतदारसंघ : डॉ. अपूर्व हिरे मुंबई शिक्षक मतदारसंघ : कपिल पाटील मुंबई पदवीधर मतदारसंघ : डॉ. दीपक सावंत कोकण पदवीधर मतदारसंघ : निरंजन डावखरे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07.30 PM 27 September 2024 : ABP MajhaPandharpur Babanrao Shinde vs Dhanraj Shinde : बबनदादा शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेंचं आव्हानTop 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 27 Sep 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
Embed widget