एक्स्प्लोर
‘मराठा आरक्षणाची मागणी सरकारनं 10 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावी’
आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मराठा क्रांती मोर्चानं जोरदार कंबर कसली आहे. सरकारनं मराठा समाजाला दिलेली आश्वासने 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत प्रत्यक्ष कृतीत न आणल्यास अर्थसंकल्पीय अधिवेशनालाच घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पनवेल : आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मराठा क्रांती मोर्चानं जोरदार कंबर कसली आहे. सरकारनं मराठा समाजाला दिलेली आश्वासने 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत प्रत्यक्ष कृतीत न आणल्यास अर्थसंकल्पीय अधिवेशनालाच घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी म्हणजेच १९ फेब्रुवारीपासून राज्यात पुन्हा मराठा आंदोलन पुकारणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं.
राज्यस्तरीय सकल मराठा समाज समन्वयकांची पनवेलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत 29 जिल्ह्यातील समन्वयक हजर होते. त्यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. मुंबईत सकल मराठा समाजाचा मोर्चा झाल्यानंतर भाजप सरकारने घोषणांचा पाऊस पाडला. मात्र, त्या घोषणा अद्याप कृतीत उतरवल्या नसल्याचा आरोप होत आहे.
हुकलेलं शतक हा इशारा, मराठा युवा क्रांती मोर्चाचे पोस्टर्स
दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर महाराष्ट्रात भाजपला इशारा देणारे पोस्टर्स मराठा युवा क्रांती मोर्चातर्फे मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात आले होते.
'हुकलेले शतक हा इशारा समजा, महाराष्ट्रात मराठ्यांच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष कराल, तर पुढच्या निवडणुकीत अर्धशतकी टप्पाही पार करणं अवघड होईल. तोच मराठ्यांचा करारा जबाब समजा' असा मजकूर या पोस्टरवर लिहिण्यात आला होता.
मराठा समाजाच्या नेमक्या मागण्या काय?
- मराठा समाजाला आरक्षण द्या.
- अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करा.
- कोपर्डी बलात्कारातील आरोपींना तातडीने शिक्षा द्या.
- मराठा समूहाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (SARTHI) स्वायत संस्था त्वरित सुरु करण्यात यावी.
- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा
- शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव द्या. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा.
- कुणबी, मराठा- कुणबी, कुणबी-मराठा यांना जातीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करणे.
- मराठा,इतर मागास, खुला प्रवर्गातील सरकारी अधिकारी कर्मचारी यांचेवर पदोन्नतीत होणारा अन्याय थांबवण्यात यावा.
- छत्रपती शिवरायांचे मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक उभारणी त्वरित सुरु करणे. छत्रपती शिवरायांच्या गडकोट विकासाचे काम त्वरित हाती घ्यावे. राजर्षी शाहू महाराजांच्या शाहू मिल कोल्हापूर येथील आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम चालू करण्यात यावे.
- प्रत्येक जिल्ह्यात मराठा भवनसाठी शासकीय जमीन देण्यात यावी.
संबंधित बातम्या :
मराठा आरक्षणाचा मुद्दा लवकर निकाली काढा, हायकोर्टात याचिका
मराठा आरक्षणासाठी सरकार दरबारी हालचाली सुरु
देशात सध्या आरक्षणाची व्यवस्था कशी आहे? मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मराठा मोर्चाचा समारोप मराठा मोर्चा : मागण्या काय आणि मिळालं काय? संभाजीराजे छत्रपती मराठा बांधवांच्या मांडीला मांडी लावून आझाद मैदानात बसले! असा मोर्चा कधी पाहिलाय का? मुंबई मराठा मोर्चा: तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं! पाकिस्तानातून पाठिंबा, ‘मराठा कौमी इतेहाद’ मराठा मोर्चाच्या पाठीशीअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement