धर्मादाय रुग्णालयांसाठी सरकारनं नेमली SIT, राज्यासह केंद्राच्या सर्व योजनांची अंमलबजावणी होणार
राज्यातील धर्मादाय रुग्णालयांसाठी सरकारने एसआयटी (SIT) नेमली आहे. सर्व धर्मदाय रुग्णालयात केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विषयक योजनांची (Yojana) अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त

मुंबई : राज्यातील धर्मादाय रुग्णालयांसाठी सरकारने एसआयटी (SIT) नेमली आहे. सर्व धर्मदाय रुग्णालयात केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विषयक योजनांची (Yojana) अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर मोठी अपडेट समोर आली आहे. धर्मादाय रुग्णालयांच्या झाडाझडतीसाठी एक स्वतंत्र अधिकारी नेमण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून अधिकाऱ्यांची नेमणूक होणार आहे.
एसआयटीमध्ये तीन विभागाच्या सदस्यांचा समावेश
निर्धन रुग्ण निधी खात्याच्या तपासणीचेही अधिकार दिले आहेत. धर्मदाय रुग्णालयात रुग्णांना उपचार मिळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एसआयटीमध्ये तीन विभागाच्या सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. धर्मादाय आयुक्त, वैद्यकीय शिक्षण आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातील सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.
धर्मादाय (Charitable Hospital) म्हणजे एक असे रुग्णालय जे समाजसेवेच्या उद्देशाने चालवले जाते. या रुग्णालयांना चालवण्यासाठी आवश्यक असलेला निधी हा दानधर्मातून किंवा इतर सामाजिक संस्थांकडून मिळतो. या रुग्णालयांचे मुख्य उद्दिष्ट्य हे गरजू आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या रुग्णांना मोफत किंवा कमी दरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देणे हे असते. या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना मोफत किंवा कमी दरात उपचार उपलब्ध करुन दिले जातात. धर्मादाय रुग्णालये समाजसेवेच्या उद्देशाने चालवली जातात. या रुग्णालयांना चालवण्यासाठी आवश्यक असलेला निधी हा दानधर्मातून किंवा इतर सामाजिक संस्थांकडून मिळतो.
महत्वाच्या बातम्या:

























