एक्स्प्लोर
उल्हासनगरमध्ये पार्किंगच्या वादातून दुकान मालकावर चाकूहल्ला

उल्हासनगर : दुचाकी पार्किंगच्या वादातून दुकान मालकावर चाकू हल्ला करण्यात आला आहे. उल्हासनगरमध्ये ही घटना घडली. या हल्ल्यात निर्मला ज्यूस सेंटरचे मालक पवन गुप्ता आणि त्यांचा कामगार इशाद अली हे गंभीर जखमी झाले आहेत.
उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 3 मध्ये ही घटना घडली. हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यात 8 ते 9 हल्लेखोर चाकूहल्ला करताना स्पष्ट दिसत आहेत.
पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जखमी दुकान मालक आणि कामगाराला उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात भर्ती करण्यात आलं आहे.
पाहा व्हिडिओ :
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
बातम्या
मुंबई
Advertisement
Advertisement



















