एक्स्प्लोर
अपघातात ब्रेन डेड, 6 वर्षांच्या चिमुरडीचं पाच लहानग्यांना जीवदान
अपघातात ब्रेन डेड झालेल्या रेव्यानी राहगडालेचे अवयव दान करण्याचा निर्णय तिच्या पालकांनी घेतला.
![अपघातात ब्रेन डेड, 6 वर्षांच्या चिमुरडीचं पाच लहानग्यांना जीवदान Gondia : 6 year old brain dead girl Revyani's parents donated her organs latest update अपघातात ब्रेन डेड, 6 वर्षांच्या चिमुरडीचं पाच लहानग्यांना जीवदान](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/04/28202037/Gondia-Brain-dead-Revyani-Organ-donate.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
गोंदिया : गोंदियातील सहा वर्षांच्या चिमुरडीने मृत्यूनंतर पाच बालकांना जीवनदान दिलं आहे. अपघातात ब्रेन डेड झालेल्या रेव्यानी राहगडालेचे अवयव दान करण्याचा निर्णय तिच्या पालकांनी घेतला.
रेव्यानीने केजी 2 ची परीक्षा दिल्यानंतर तिला सुट्टी लागली. सुट्टीत मामासोबत बाईकवरुन जात असताना त्यांचा अपघात झाला. अपघातात गंभीर जखमी झालेली रेव्यानी आठ दिवस उपचारांना प्रतिसाद देत नव्हती. अखेर डॉक्टरांनी ती ब्रेन डेड झाल्याचं घोषित केलं.
रेव्यानीचे वडील पोलिस दलात कार्यरत असून आई गृहिणी आहे. आपल्या अंगणातली कळी अकाली खुडली गेल्याचं दुःख बाजुला ठेवत रेव्यानीच्या पालकांनी तिचे अवयव दान करण्याचा मोठा निर्णय घेतला.
रेव्यानीचं हृदय मुंबईतल्या दोन वर्षांच्या मुलीला देण्यात आलं, तर किडनी चेन्नईच्या एका चिमुरडीला दान करण्यात आली. तिचं यकृत आणि डोळे नागपुरातील लहानग्यांना दान करण्यात आले.
रेव्यानीच्या पालकांनी आपलं दु:ख विसरत तिच्याच वयाच्या चिमुकल्यांना जीवनदान दिलं. त्यामुळे रेव्यानी मृत्यूनंतरही अवयवांच्या रुपाने या जगात असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
क्राईम
परभणी
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)