एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण सभा; सत्ताधाऱ्यांवर खुर्च्या बांधून ठेवण्याची वेळ

गोकुळच्या सर्वसाधारण सभेत अनेकदा वाद होतात. महादेव महाडिक गट आणि सतेज पाटील गटामध्ये अनेक कुरबुरी आहेत. दोन्ही गटांमधील वादांमुळे सभेत खुर्च्या, बाटल्या आणि चपलांची फेकाफेक झाल्याच्या घटना याआधी घडल्या आहेत.

कोल्हापुर : गोकुळ दूध संघाची आज (30 ऑक्टोबर) सर्वसाधारण सभा सुरु आहे. मात्र या सभेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खुर्च्या बांधून ठेवण्याची वेळ सत्ताधारी गटावर आली आहे. सभेच्या ठिकाणी सभासदांसाठी ठेवण्यात आलेल्या हजारो खुर्च्या आयोजकांनी बांधून ठेवल्या आहेत. गोकुळची सभा म्हटलं गोंधळ हा ठरलेला असतो. त्यामुळे या सभेच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. या सभेतून मल्टीस्टेटचा मुद्दा आधीच निकाली निघाला आहे. तरीदेखील अनेक मुद्दे असे आहेत, ज्यामुळे वाद होऊ शकतात, त्यामुळे या सभेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. गोकुळच्या सर्वसाधारण सभेत अनेकदा वाद होतात. महादेव महाडिक गट आणि सतेज पाटील गटामध्ये अनेक कुरबुरी आहेत. दोन्ही गटांमधील वादांमुळे  सभेत खुर्च्या, बाटल्या आणि चपलांची फेकाफेक झाल्याच्या घटना याआधी घडल्या आहेत. खुर्च्यांची फेकाफेक, मोडतोड होऊ नये यासाठी हजारो खुर्च्या बांधून ठेवल्या आहेत. दूध संकलनातील वाढ, सभासदांच्या हितांच्या काही मागण्या आहेत, त्यावर आजच्या सभेत चर्चा होणार आहे. मागण्या विचारात घेऊन अनेक ठराव मांडले जातील, त्यास विरोधही होईल, त्यानंतरही मागण्या मान्य होतात का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. महादेव महाडिक गटाची सध्या गोकुळवर सत्ता आहे. त्यांनीच गोकुळ मल्टिस्टेट करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या सर्वसाधारण सभेत यावरुन खूप रणकंदन माजलं होतं. त्यामुळे 30 तारखेला होणाऱ्या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र त्याआधीच गोकुळच्या सभेतील महत्त्वाचा मुद्दा निकाली निघाला आहे. त्यामुळे लढाई आधीच सतेज पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके गटाने बाजी मारल्याचं दिसून येतं आहे. 'गोकुळ'च्या सभेत तुफान राडा, खुर्ची भिरकावून मारहाण मल्टिस्टेट म्हणजे काय? - मल्टिस्टेट म्हणजे इतर राज्यात आपल्या संस्थेचा विस्तार करणे - सहकार कायदा कलम 81 आणि 82 नुसार राज्य सरकारचे नियंत्रण निघून जातं - केंद्राच्या अधिपत्याखाली संस्था जात असल्याने संचालकांना मुक्त कारभार करता येतो - त्यामुळे संस्थेच्या सभासदांच्या हक्कावर मर्यादा येण्याची शक्यता अधिक असते - चुकीचा कारभार केला तर राज्य सरकारला संस्थेवर प्रशासक नेमता येत नाही किंवा कोणतीही कारवाई करता येत नाही व्हिडीओ पाहा 'गोकुळ'च्या सभेत तुफान राडा, खुर्ची भिरकावून मारहाण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जितेंद्र आव्हाडांनी बारामतीला जाऊन दादांच्या गाईचा गोठा साफ करावा, चॅलेंज पूर्ण करावे; निकानंतर मिटकरी भिडले
जितेंद्र आव्हाडांनी बारामतीला जाऊन दादांच्या गाईचा गोठा साफ करावा, चॅलेंज पूर्ण करावे; निकानंतर मिटकरी भिडले
Amol Khatal : बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज नेत्याला पाडलं, अमोल खताळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सुजय विखेंच्या पराभवाचा बदला...
बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज नेत्याला पाडलं, अमोल खताळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सुजय विखेंच्या पराभवाचा बदला...
Raj Thackeray MNS: महायुती सरकारच्या शपथविधीपूर्वी शिवतीर्थवर अचानक हालचालींना वेग, राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
महायुती सरकारच्या शपथविधीपूर्वी शिवतीर्थवर अचानक हालचालींना वेग, राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
Amol Khatal : 40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 24 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMahesh Sawant Mahim : ठाकरेंच्या लेकाला हरवलं,सरवणकरांना घरी बसवलं; महेश सावंत EXCLUSIVEDeepak Kesar : शिवाजी पार्कवर शपथविधी सोहळा होण्यात तांत्रिक अडचणी - केसरकरMahayuti Seat Sharing : कसा असेल नव्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला?  ABP Majha कडे EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जितेंद्र आव्हाडांनी बारामतीला जाऊन दादांच्या गाईचा गोठा साफ करावा, चॅलेंज पूर्ण करावे; निकानंतर मिटकरी भिडले
जितेंद्र आव्हाडांनी बारामतीला जाऊन दादांच्या गाईचा गोठा साफ करावा, चॅलेंज पूर्ण करावे; निकानंतर मिटकरी भिडले
Amol Khatal : बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज नेत्याला पाडलं, अमोल खताळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सुजय विखेंच्या पराभवाचा बदला...
बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज नेत्याला पाडलं, अमोल खताळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सुजय विखेंच्या पराभवाचा बदला...
Raj Thackeray MNS: महायुती सरकारच्या शपथविधीपूर्वी शिवतीर्थवर अचानक हालचालींना वेग, राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
महायुती सरकारच्या शपथविधीपूर्वी शिवतीर्थवर अचानक हालचालींना वेग, राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
Amol Khatal : 40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
Eknath Shinde Shivsena : सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
Ajit Pawar: मावळ पॅटर्न उद्ध्वस्त करणारे सुनील शेळके कसे जिंकले, मोदींसोबतच्या भेटीचा किस्सा दादांनी सांगितला, तटकरेंनी गालगुच्चा घेतला
मावळ पॅटर्न उद्ध्वस्त करणारे सुनील शेळके कसे जिंकले, मोदींसोबतच्या भेटीचा किस्सा दादांनी सांगितला, तटकरेंनी गालगुच्चा घेतला
मोठी बातमी: महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
Embed widget