![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Goa Election 2022 : आदित्य ठाकरे गोव्याच्या मैदानात, पहिल्याच सभेत नवी घोषणा, गोव्याची शान, धनुष्य बाण
गोव्याचा विकास होताना दुर्दैवाने पर्यावरणाची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे येथे गेल्या दहा वर्षात गोव्याचा विकास झाला आहे की कंत्राटदाराचा असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
![Goa Election 2022 : आदित्य ठाकरे गोव्याच्या मैदानात, पहिल्याच सभेत नवी घोषणा, गोव्याची शान, धनुष्य बाण Goa Aaditya Thackeray slams bjp goa assembly election Goa Election 2022 : आदित्य ठाकरे गोव्याच्या मैदानात, पहिल्याच सभेत नवी घोषणा, गोव्याची शान, धनुष्य बाण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/11/be13012d1712f89c7ddcf20979f32e09_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. गोवा विधानसभा निवडणुकीचे मतदान चार दिवसांवर उरलेले असताना महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे गोवा दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे यांनी गोव्यात पहिल्याच सभेत 'गोव्याची शान, धनुष्य बाण' अशी घोषणा केली आहे.
गोव्याचा विकास झाला की कंत्राटदाराचा, आदित्य ठाकरेंचा सवाल
गोव्यात जगभरातून पर्यटक येत आहे. मात्र गोव्यातील स्थानिकांकडे दुर्लक्ष होत आहे. गोव्याचा विकास होताना दुर्दैवाने पर्यावरणाची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे येथे गेल्या दहा वर्षात गोव्याचा विकास झाला आहे की कंत्राटदाराचा असा सवाल उपस्थित करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. गोव्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिवसेना रणांगणात उतरली असल्याचे देखील ते या वेळी म्हणाले.
गोव्यातील भूमीपुत्रांना न्याय देणार
आदित्य ठाकरे म्हणाले, गोव्याशी शिवसेनेची नाते वेगळे आहे. अनेकांची मंदिरे, कुलदावत गोव्यात आहे. स्थानिक भूमीपत्रांना न्याय देण्यासाठी आम्ही येथे आलो आहे. स्थानिकांना न्याय देण्यासाठी आलो आहे. आम्ही येथे फक्त निवडणुकीसाठी आलो नाहीत. तर आम्ही या पुढे गोव्यातील जनतेसोबत राहून काम करणार आहे. गोव्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिवसेना रणांगणात उतरली आहे. शिवसेनेचा दरारा काय असतो ही आता गोव्याच्या राजकारणाला कळणार आहे.
गोव्यात प्रचार करताना प्रत्येक गोवेकरांचा आवाज ऐकला पाहिजे. निवडणुकीसाठी 72 तास राहिले आहे. गोव्याची पुढील पाच वर्षे कशी असणार आपल्याला लक्ष द्यायचे आहे. महाराष्ट्र मॉडेल घेऊन शिवसेना रणांगणात उतरणार आहे. शिवसेनेला इथे प्रत्येकाच्या घरी पोहचायचे आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गेले दोन वर्ष टॉप फाईव्ह मुख्यमंत्र्यांच्या यादीत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
Goa Election 2022 : 'हांव हायलो तुमका मेळपाक', आदित्य ठाकरेंची गोंयेकरांना साद, आजपासून प्रचारात
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)