(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Arvind Sawant : सावरकर मोठे आहेतच त्यांना भारतरत्न दिल्यानं देश मोठा होईल : अरविंद सावंत
सावरकरांना भारतरत्न देण्यास केंद्र सरकारकडून उशीर होत असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी केलं.
Arvind Sawant : स्वातंत्र्यवीर सावरकर मोठे आहेतच, त्यांना भारतरत्न दिल्याने देश मोठा होईल असे वक्तव्य शिवसेना खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी केलं आहे. राज्य सरकारचा काही सबंध नाही, सावरकरांना भारतरत्न देण्यास केंद्र सरकारकडून उशीर होत आहे. सावरकर यांचे हिंदुत्व समजतंय का, समजले तर उमजतंय का, उमजले तर पचतय का असेही सावंत यावेळी म्हणाले. सावरकर हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी भारावलेले होते असेगी सावंत म्हणाले.
सावरकर यांचा छळ काय होत हे बाळासाहेब सांगायचे असेही अरविंद सावंत यावेळी म्हणाले. ब्रिटिश अधिकारी वह्यांची पानं फाडायचे तर त्यांनी भिंतीवर कविता लिहिल्या. देशाच्या स्वातंत्र्यासाठी भारावलेले सावरकर होते असेही यावेळी सावंत म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही केलं अभिवादन
दरम्यान, आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती आहे. या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्यांना विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. ते प्रतिभावान साहित्यिक, परखड वक्ते आणि उत्कृष्ट असे संघटक होते. उच्च विद्याविभूषित स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीच्या विरोधात रान उठवले होते. त्यांचे विज्ञानवादी विचार आणि प्रखर राष्ट्रभक्ती आजही प्रेरणादायी आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज 139वी जयंती आहे. याच दिवसाचे निमित्त साधत निर्माते संदीप सिंग आणि आनंद पंडित दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आगामी ‘स्वतंत्र वीर सावरकर’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. यात अभिनेता रणदीप हुडा ‘वीर सावरकरां’ची भूमिका साकारत आहे. पोस्टरवर 'हिंदुत्व धर्म नहीं, इतिहास है' असे लिहिले आहे. ऑगस्ट 2022पासून या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे.‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचे कथानक विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग हे लंडन, महाराष्ट्र, अंदमान आणि निकोबार येथे होणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Swatantra Veer Savarkar : रणदीप हुडाचा ‘वीर सावरकर’ चित्रपटातील पहिला लूक प्रेक्षकांच्या भेटीला!
- Sushilkumar Shinde on Savarkar : सावरकर महान होते, अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांचं मोठं काम