एक्स्प्लोर
गिरीश महाजन आणि सुजय विखे पाटील पुन्हा एकत्र, एकाच हेलिकॉप्टरमधून मुंबईला
आज पुन्हा भाजप नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सुजय विखे पाटील एकत्र दिसले. या दोघांनी नगरहून मुंबईकडे एकाच हेलिकॉप्टरमधून प्रवास केल्याने पुन्हा जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत.
अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर दक्षिणमधील आमदार आणि काही कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन अहमदनगरमध्ये आले होते. बैठक संपल्यानंतर गिरीश महाजन आणि सुजय विखे पाटील एकाच हेलिकॉप्टरमधून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीकडे असल्यामुळे सुजय विखे भाजपमध्ये जातील अशी चर्चा जोरदार सुरू आहे. त्यातच काल रात्रीच गिरीश महाजन यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आज पुन्हा गिरीश महाजनांसोबत सुजय विखे मुंबईला रवाना झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.
दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघावरुन सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये तिढा कायम आहे. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील हे दक्षिण अहमदनगरमधून लोकसभा लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र ही जागा राष्ट्रवादीकडे आहे. त्यात राष्ट्रवादी आपली जागा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे सुजय विखे पाटील हे इतर पक्षांतून तिकिटासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा या सुजय विखे पाटलांवर आहेत. सध्या त्यांच्या राजकीय हालचाली आघाडीसाठी धक्का देणाऱ्या ठरत आहेत.
आज पुन्हा भाजप नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सुजय विखे पाटील एकत्र दिसले. या दोघांनी नगरहून मुंबईकडे एकाच हेलिकॉप्टरमधून प्रवास केल्याने पुन्हा जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत.
सुजय विखे पाटील जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांना भेटले, राजकीय चर्चांना उधाण
विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी काल भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. गिरीश महाजन यांच्या शिवनेरी या शासकीय निवासस्थानी दोघांची तासभर बैठक झाली. मात्र ही बैठक राजकीय नसल्याचे दोघांनीही स्पष्ट केले. असे असले तरी ईडीची कारवाई टाळण्यासाठी सुजयला भाजपमध्ये पाठवत आहेत अशी टीका शिवसेनेने केली होती.
राजकीय शस्त्रक्रियेची संधी आलीच तर नक्की करेन, माझ्याकडे ते खातंच आहे : गिरीश महाजनांचं सूचक विधान
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे पाटील इच्छुक आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस जागा सोडत नसल्याने सुजय हे भाजपकडून चाचपणी करत असल्याचे बोलले जात होते. मात्र कालच्या बैठकीत सुजय विखे पाटील यांच्यासोबत कुठलीही राजकीय चर्चा नाही तर त्यांच्या मेडिकल कॉलेज मधल्या पीजी विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय प्रवेशाबाबत चर्चा झाली, असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले होते. पण राजकारणात सध्या काहीही होऊ शकतं. आजकाल कोणीही कुठेही जातं. उत्तरप्रदेशात पाहिलं तर नेताजी मुलाच्या विरोधात आहेत. आता प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. राजकीय शस्त्रक्रियेची संधी आलीच तर नक्की करेन, माझ्याकडे ते खातंच आहे, असे सूचक विधान गिरीश महाजन यांनी केले होते. माझ्याकडचा पेशंट सहसा बरा होऊनच जातो, याची आपल्याला कल्पना असेलच, असेही महाजन यावेळी म्हणाले होते.
...तर मी वर्षावर वर गेलो असतो : सुजय विखे पाटील
राजकीय चर्चा करायची असती तर मी वर्षावर वर गेलो असतो. गिरीश महाजन यांना कॉलेजच्या विषयासाठी भेटलो असल्याचे सुजय विखे पाटील यांनी काल सांगितले होते. या भेटीत राजकीय काही नाही. गिरीश महाजन ज्येष्ठ आहेत. नेहमीच मार्गदर्शन करत असतात. नेहमी मदत करतातआणि मदत केली आहे. मी डॉक्टर आहे आहे, मी स्वत: माझं औषध तयार करीन, असेही ते महाजन यांच्या 'पेशंट' वाल्या वक्तव्याला उत्तर देताना म्हणाले. मी स्वतंत्र व्यक्ती आहे. वडिलांनी स्वातंत्र्य दिलं आहे, मी माझा निर्णय घेऊ शकतो, असेही ते म्हणाले होते.
ईडीची पीडा टळो म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुजयला भाजपत पाठवलं का? : शिवसेना
राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्यावरील आणि त्यांच्या परिवारावरील ईडीची कारवाई थांबवण्यासाठी सुजय यांना भाजपमध्ये पाठवले का? असा टोला शिवसेना प्रवक्ता आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी काल लगावला होता. तसेही राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्ष नेते कमी आणि शासनाचे दूत म्हणूनच कार्यरत होते, हे आपण गेले काही वर्ष अनुभवले आहेच, भाजप शासनाची विरोधी पक्ष नेत्यांनी मदत करण्यामागेही त्यांचा एक पाय भाजपत तर एक कॉंग्रेसमध्ये अशी अवस्था असण्यामागेही त्याना आपल्यावर ईडीची करवाई तर होणार तर नाही ना अशी भीती वाटत तर नव्हती ना, असेही त्या म्हणाल्या होत्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement