कोरोना काळातील कर्मचारी कपात रेल्वे स्टेशन मास्तरच्या जीवावर बेतली? हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू
ही घटना घडल्यानंतर पनवेल एक्सप्रेस (panvel expess) आणि शिर्डी (shirdi) या दोन ट्रेन रेल्वे स्टेशनवरच थांबवून ठेवाव्या लागल्या.
Beed News : बीड जिल्ह्यातील घाटनांदूर रेल्वे स्टेशन येथील स्टेशन मास्तर (station master death) मुसाफिर सिंग (वय 55) वर्ष यांचा हृदयविकाराच्या (heart attack) तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ड्युटीवर असताना या स्टेशन मास्तरचा मृत्यू झाल्याचे समजते. त्यानंतर पनवेल एक्सप्रेस (Panvel express) आणि शिर्डी (shirdi) या दोन ट्रेन रेल्वे स्टेशनवरच थांबवून ठेवाव्या लागल्या. ही घटना परळी जवळच्या घाटनांदुर रेल्वे स्टेशन येथे घडली. कोरोनाच्या काळात रेल्वेने कर्मचारी कपात केल्यामुळे रेल्वे स्टेशन मास्तरवर अधिक ताण आल्याचे सांगण्यात येत आहे.
रेल्वेसाठी सिग्नल मिळत नसल्याने समोर आली घटना..
रात्री तीन वाजता आलेली पनवेल एक्स्प्रेस ही गाडी पानगाव रेल्वे स्थानकावर आली. मात्र या रेल्वे स्थानकावरून पुढच्या घाटनांदुर रेल्वेस्थानकावर सिग्नल देण्यासाठी संपर्क होत नव्हता. म्हणून दुसरा कर्मचारी पाठवण्यात आला, त्यावेळी ड्युटीवर असलेल्या रेल्वे मास्तरचा मृत्यू झाल्याचे समजले. मात्र अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ या कारणामुळे पनवेल एक्सप्रेस ही ट्रेन पानगाव रेल्वे स्थानकावरच उभी होती. त्याच दरम्यान शिर्डी एक्सप्रेस परळी रेल्वे स्टेशनवर येऊन थांबली होती, जी परळी वरून घाटनांदुर मार्गे पानगावला जाणार होती. मात्र या रेल्वेलाही उशीर झाला. दरम्यान, कोरोनाच्या काळात रेल्वेकडून अनेक कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली, तशी कपात घाटनांदूर रेल्वे स्टेशनवर असलेल्या कर्मचाऱ्यांची सुद्धा करण्यात आली. यापूर्वी या रेल्वे स्टेशन अंतर्गत पाच कर्मचारी हे काम बघायचे आता मात्र तीनच कर्मचारी काम बघतात. कोरोनाच्या काळात रेल्वेने कर्मचारी कपात केल्यामुळे दुसरा कर्मचारी रेल्वे स्टेशनवर नव्हता
कर्मचारी कपात झाली नसती तर स्टेशन मास्टरचा जीव वाचवता आला असता..
परळी जवळच्या घाटनांदुर रेल्वे स्थानकावर यापूर्वी पाच कर्मचारी कामावर ते असायचे, विशेष म्हणजे रेल्वे स्टेशनवर एकावेळी दोन कर्मचाऱ्यांची ड्युटी लावलेली असायची. मात्र कोरोनाच्या काळामध्ये एकूण पाच कर्मचाऱ्यांपैकी दोन कर्मचारी कमी केले. त्यामुळे तीनच कर्मचारी ड्युटीवर ते असायचे. विशेष म्हणजे स्टेशन मास्टर हा एकटाच एकावेळी ड्युटीवर असायचा आणि मध्यरात्री स्टेशन मास्टर मुसाफिर सिंग यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, त्यावेळी दुसरा कर्मचारी या ठिकाणी स्टेशन वर कामावर नव्हता, जर दुसरा कर्मचारी स्टेशन वर कामावर असता तर कदाचित या स्टेशन मास्टर वरती उपचार झाले असते अशी भावना रेल्वे कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- राज्य सरकारकडून वीज कर्मचाऱ्यांना मेस्मा, संपावर जाण्यास मनाई
- West Bengal Violence : बीरभूम हिंसाचार प्रकरणात 21 आरोपी असल्याची सीबीआयची माहिती, 10 जणांचा झाला होता जळून मृत्यू
- महागाईविरोधात 31 मार्चपासून काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन ; नाना पटोलेंची माहिती