(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gadchiroli Rain : गडचिरोलीतील आठ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी, 10 मार्ग बंद, अनेक गावांचा संपर्क तुटला
गडचिरोली जिल्ह्यात (Gadchiroli) मुसळधार पावसानं तुलनेनं जास्तच थैमान घातलं आहे. गडचिरोलीतील स्थिती आणि पुराची परिस्थिती बघता शनिवार 16 जुलैपर्यंत शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Gadchiroli Flood: राज्यभर पावसानं (Maharashtra Rains) धुमाकूळ घातला आहे. विदर्भात देखील पावसानं हाहाकार माजवला आहे. त्यात गडचिरोली जिल्ह्यात (Gadchiroli) मुसळधार पावसानं तुलनेनं जास्तच थैमान घातलं आहे. गडचिरोलीतील स्थिती आणि पुराची परिस्थिती बघता शनिवार 16 जुलैपर्यंत शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 24 तासात 12 पैकी आठ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. भामरागड येथे 24 तासात 160 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यातील 10 मार्ग सध्या बंद अवस्थेत आहेत. गोसेखुर्द धरणातून आठ हजारांहून अधिक क्युसेक जलविसर्ग होत असल्याने वैनगंगा नदीकाठच्या गावांना दिला अति सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुढचे काही दिवस मुसळधार पावसाचे असल्याने नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलं आहे. सिरोंचा तालुक्यातील मेडीगट्टा महा बंधाऱ्यातून 15 लाख 77 हजार क्युसेक एवढा विसर्ग सुरू आहे. भामरागड तालुकास्थानाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या पर्लकोटा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे भामरागड तालुका आणि तालुक्यातील अनेक गावांचा जिल्हा मुख्यालयापासून संपर्क तुटला आहे.
गोसीखुर्द धरणातून 12 हजार क्यूसेक जलविसर्ग
गोसीखुर्द धरणातून 12 हजार क्यूसेक जलविसर्ग करणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने गडचिरोली जिल्हा प्रशासनाला माहिती दिली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने पाऊस होत असल्याने विसर्ग वाढवणार असल्याची माहिती आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्याच्या वैनगंगा नदीकाठच्या भागात पुर येण्याची शक्यता आहे. याआधी ऑगस्ट 2020 मध्येही अशाच पद्धतीने गोसीखुर्दच्या प्रलयकारी विसर्गाने जिल्ह्यात मोठे नुकसान केले होते. नागरिकांनी घरी राहून कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय मीना यांनी केलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Plaghar Rains : पालघरमध्ये पावसाचा हाहाकार; वैतरणा नदीच्या पुरात 13 कामगार अडकले, बचावकार्य सुरु
Maharashtra Rains : पालघरसह नाशिक आणि पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत