एक्स्प्लोर

गडचिरोली पोलिसांचा नक्षल्यांवर 'सर्जिकल स्ट्राईक', छत्तीसगड सीमेवरील शस्त्र कारखाना उध्वस्त

Gadchiroli Naxal : छत्तीसगड सीमेवर गडचिरोली पोलिसांच्या सी 60 पथकाला मोठं यश आलं आहे. छत्तीसगड सीमेपासून 4 ते 5 किमी आत छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा शस्त्र कारखाना उद्ध्वस्त केला आहे.

गडचिरोली : छत्तीसगड सीमेवर गडचिरोली पोलिसांच्या सी 60 पथकाला मोठं यश आलं आहे. छत्तीसगड सीमेपासून 4 ते 5 किमी आत छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा शस्त्र कारखाना उद्ध्वस्त केला आहे. विशेष म्हणजे नक्षलींचा हा शस्त्र कारखाना नक्षलींचा गड मानला जाणाऱ्या अबुझमाड भागात होता. त्यामुळे एकाप्रकारे वाघाच्या जबड्यात घुसून गडचिरोली पोलिसांच्या सी 60 दलाने त्याचे दात पाडले आहे, असा पोलीस अधिकाऱ्यांचा दावा आहे. काल 5 मार्च रोजी ही कारवाई केल्याची माहिती आहे.

दरम्यान या घटनेत सी 60 दलाचा एक जवान जखमी झाला आहे, इतर जवान सुरक्षित आहेत. मार्च ते मे महिन्यादरम्यान नक्षलींचा टीसीओसी म्हणजेच टेक्टिकल काऊंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन असते. त्याकाळात नक्षली सीमा ओलांडून महाराष्ट्रात येतात. त्यामुळे यंदा सी 60 पथकाने अॅडिशनल एसपींच्या नेतृत्वात नक्षलींचा टीसीओसीला आळा घालण्यासाठी काऊंटर ऑपरेशन राबवले होते. त्याच दरम्यान नक्षलींचा शस्त्र कारखाना अबुझमाड परिसरात असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानंतर सी 60 पथकाने तो कारखाना उध्वस्त केला आहे. 48 तास हे ऑपरेशन सुरू होते. या दरम्यान 3 वेळा गोळीबार / चकमकी झाल्या. ऑपरेशन मध्ये सहभागी असलेल्या गडचिरोली पोलिसांच्या मदतीसाठी आज गडचिरोली पोलिसांचा हेलिकॉप्टर आणि हवाई हेलिकॉप्टर तैनात करण्यात आलं होतं.

पोलिसांच्या माहितीनुसार नक्षलवाद्यांनी आधी पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर विशेष अभियान पथकाच्या जवानांची त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. यानंतर नक्षलवादी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळून गेले. या अभियानादरम्यान एक जवान जखमी झाला आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. नक्षलविरोधी उत्कृष्ट कारवाई करणाऱ्या जवानांचे पोलिस अधीक्षकांनी अभिनंदन केलं आहे.

महाराष्ट्राच्या जवानाला वीरमरण

गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगड येथील नारायणपूरमध्ये कार्यरत इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसमधील (आयटीबीपी) हेड कॉन्स्टेबल मंगेश हरिदास रामटेके (40) यांना वीरमरण आले. नक्षलवाद्यांनी पेरुन ठेवलेल्या भूसुरुंगाचा स्फोट झाल्याने ते शहीद झाले. आयटीबीपीच्या 53 व्या बटालियनमधील हेड कॉन्स्टेबल शहीद मंगेश रामटेके यांचा जन्म 25 डिसेंबर 1981 रोजी झाला. ते 6 जुलै 2007 रोजी आयटीबीपीमध्ये रुजू झाले. त्यांचे मुख्यालय आंध्रप्रदेशातील चित्तुर येथे आहे. मागील दोन वर्षांहून अधिक कालावधीपासून ते छत्तीसगडमध्ये कार्यरत होते. कालच दुपारी 3 वाजता ते फोनवर कुटुंबासोबत बोलले होते आणि एप्रिल महिन्यात सुट्टीवर येणार होते.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पोटच्या मुलानेच आईला संपवलं, धक्कादायक घटनेनं अहिल्यानगर हादरलं, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
पोटच्या मुलानेच आईला संपवलं, धक्कादायक घटनेनं अहिल्यानगर हादरलं, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
सुनिल तटकरेंची रवींद्र चव्हाणांसोबत ZP पे चर्चा; राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन, CBI चौकशीची मागणी
सुनिल तटकरेंची रवींद्र चव्हाणांसोबत ZP पे चर्चा; राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन, CBI चौकशीची मागणी
धनंजय मुंडेंना मंत्री केल्यास राष्ट्रवादी पक्ष संपेल, माझ्याकडे त्यांची 22 प्रकरणं; मनोज जरांगेंनी पुन्हा डिवचलं
धनंजय मुंडेंना मंत्री केल्यास राष्ट्रवादी पक्ष संपेल, माझ्याकडे त्यांची 22 प्रकरणं; मनोज जरांगेंनी पुन्हा डिवचलं
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना

व्हिडीओ

Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारत-अमेरिका व्यापारी करार अंतिम टप्प्यात; भारतीय टीम पुढील आठवड्यात US दौऱ्यावर 
भारत-अमेरिका व्यापारी करार अंतिम टप्प्यात; भारतीय टीम पुढील आठवड्यात US दौऱ्यावर 
सुनिल तटकरेंची रवींद्र चव्हाणांसोबत ZP पे चर्चा; राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन, CBI चौकशीची मागणी
सुनिल तटकरेंची रवींद्र चव्हाणांसोबत ZP पे चर्चा; राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन, CBI चौकशीची मागणी
Rohit Pawar and Ajit Pawar: राष्ट्रवादीतील स्वत:चं महत्त्व टिकवण्यासाठी काही नेते शरद पवारांना विरोध करतायत, आमदारांनाही धमकावलं? रोहित पवारांचा खळबळनजक दावा
राष्ट्रवादीतील स्वत:चं महत्त्व टिकवण्यासाठी काही नेत्यांचा शरद पवारांना विरोध, आमदारांना धमकावलं? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना
हर्षवर्धन सपकाळांकडून शिवप्रेमींची दिलगिरी; भाजपचा खोडसाळपणा म्हणत वक्तव्याचा अर्थही समजावला
हर्षवर्धन सपकाळांकडून शिवप्रेमींची दिलगिरी; भाजपचा खोडसाळपणा म्हणत वक्तव्याचा अर्थही समजावला
इमरान खान यांच्यासाठी एकवटले माजी कर्णधार, कपिल देव, सुनील गावस्कर यांच्यासह 14 दिग्गजांचं पाकिस्तान सरकारला पत्र
इमरान खान यांच्यासाठी कपिल देव, सुनील गावस्कर यांच्यासह 14 दिग्गजांचं पाकिस्तान सरकारला पत्र...
'ठाणे की रिक्षा'वाला कुणाला कामरा विधानभवनात; सोबत सुषमा अंधारे अन् वकील, अंगावर लक्षवेधी टी-शर्ट
'ठाणे की रिक्षा'वाला कुणाला कामरा विधानभवनात; सोबत सुषमा अंधारे अन् वकील, अंगावर लक्षवेधी टी-शर्ट
जुन्या चित्रपटस्टाईलने मामा भाच्याचे अपहरण, राजस्थानहून पार्सल आल्याचा बनाव; 3 तासांत आरोपी गजाआड
जुन्या चित्रपटस्टाईलने मामा भाच्याचे अपहरण, राजस्थानहून पार्सल आल्याचा बनाव; 3 तासांत आरोपी गजाआड
Embed widget