एक्स्प्लोर
गडचिरोलीत पोलिसांच्या चकमकीत 13 माओवाद्यांना कंठस्नान
पोलिसांनी गडचिरोलीत भामरागडमध्ये केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 13 माओवाद्यांना ठार मारण्यात आलं.
![गडचिरोलीत पोलिसांच्या चकमकीत 13 माओवाद्यांना कंठस्नान Gadchiroli : 13 Maoist killed in combing Operation latest update गडचिरोलीत पोलिसांच्या चकमकीत 13 माओवाद्यांना कंठस्नान](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/04/12174831/gadchiroli-compressed-300x300.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
फाईल फोटो
गडचिरोली : गडचिरोली पोलिसांच्या कारवाईत तब्बल 13 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. डीव्हीसीचे सदस्य असलेले साईनाथ आणि सिनू या दोघांनाही ठार मारण्यात आलं. राज्यातील ही आजवरची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
पोलिसांनी गडचिरोलीत केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 13 माओवाद्यांना ठार मारण्यात आलं. भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगल परिसरातील पोलिस आणि माओवाद्यांची चकमक झाली.
43 वर्षांचा सिनू हा मूळ वारंगलचा असून त्याचं खरं नाव विजयेंद्र राऊते. सुरुवातीला तो आंध्र प्रदेशमध्ये कार्यरत होता. 2003 मध्ये गडचिरोलीत तो दाखल झाला.
अनेक जबाबदाऱ्या पार पाडत काही वर्षांपासून तो दक्षिण गडचिरोली डिव्हीजनचा सचिव झाला. सिनूची पत्नीही नक्षल चळवळीत असल्याची माहिती आहे. मात्र ती पैसे घेऊन पळाल्यामुळे चळवळीत त्यांच्याविरोधात असंतोष होता.
साईनाथ हा पेरीमिली दलम कमांडर, त्याला डिव्हीजनल कमिटी सदस्य बनवण्यात आलं होतं. साईनाथ अत्यंत सक्रिय होता. त्याचं वय 35 वर्षांच्या घरात होतं. सातत्याने गडचिरोलीत होत असलेल्या अनेक नक्षली कारवाया आणि हत्याकांडाचा तो सूत्रधार होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बीड
बीड
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)