Maharashtra Rain : 12 सप्टेंबरपासून कोकणसह मुंबई आणि ठाण्यात पावसाचा जोर वाढणार, पुढील पाच दिवस मान्सून सक्रिय
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार 12 सप्टेंबरपासून राज्यात पावासाचा जोर वाढणारआहे. 12 सप्टेंबरपासून कोकणसह मुंबई आणि ठाण्यात पावसाचा जोर वाढणार आहे.
Maharashtra Rain : सध्या राज्याच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. काही ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार 12 सप्टेंबरपासून राज्यात पावासाचा जोर वाढणारआहे. 12 सप्टेंबरपासून कोकणसह मुंबई आणि ठाण्यात पावसाचा जोर वाढणार आहे. तसेच घाट भागातही मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळं नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
पुढील पाच दिवस मान्सून सक्रिय राहणार
हवामान विभागान वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पुन्हा एकदा पावासाचा जोर वाढणार आहे. सध्या मुंबई आणि ठाणे परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहेत. या भागात मंगळवारपासून पावसाचा जोर अधिक वाढणार आहे. तसेच कोकणातही पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागानं सांगितले आहे. पुढील चार ते पाच दिवस मान्सून महाराष्ट्रात सक्रीय राहणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.
आज राज्यात पावसाचा यलो अलर्ट, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन
दरम्यान, राज्यात गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवेळी पावसानं हजेरी लावल्यानं अनेक ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला. मुंबईसह ठाणे परिसरात पावसानं चांगलीच हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. तसेच पुणे, नाशिक, अहमदनगर या भागातही पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, आजही हवामान विभागानं राज्यात पावासाचा इशारा दिला आहे. आजही संपूर्ण राज्यात हवामान विभागानं पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पावसानं हजेरी लावली आहे. मुंबई आणि परिसरात रात्री जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला. वाहतूक संथ गतीनं सुरु होती.
आत्तापर्यंत राज्यात चांगला पाऊस
जूनपासून आत्तापर्यंत राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, राज्यात चांगला पाऊस झाल्यामुळं नदी (Raiver) आणि धरणांच्या (Dam) पाणी पातळीत वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील लहान, मध्यम आणि मोठ्या धरणांमध्ये मिळून 85 टक्के पाणीसाठा आहे.
यावर्षी राज्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसाचा काही ठिकाणी फटका देखील बसला आहे. मात्र, आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. आत्तापर्यंत राज्यातील लहान, मध्यम आणि मोठ्या धरणांमध्ये मिळून 85 टक्के पाणीसाठा झाला. मागील वर्षी याच काळात पाणी प्रकल्पाचा पाणी साठा हा 67 टक्क्यांवर होता. त्यामानानं यावर्षी पाण्याच्या साठ्यात मोठी वाढ झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: