एक्स्प्लोर

नोटाबंदीसाठी दोन वर्षापासून तयारी : मुख्यमंत्री

नागपूर : नोटाबंदीचे निर्णय उघडपणे घ्यायचे नसतात. अर्थसंकल्पही गोपनीय ठेवला जातो. नोटाबंदीसाठी दोन वर्षापासून तयारी सुरु होती, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. नोटाबंदीबाबत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन सादर केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अर्थतज्ज्ञ नसले, तरी ते जमिनीवर काम करणारे नेते आहेत, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी मोदींच्या निर्णयाचं समर्थन केलं. देशातील काळा पैसा बाहेर आला पाहिजे, अशी सभागृहातील प्रत्येक व्यक्तीची अपेक्षा आहे. भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे, मात्र त्याची जननी काळा पैसा आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. पहिल्यांदाच चलनबंदी नाही चलन बंदी देशात पहिल्यांदा घडलं नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दर दहा वर्षांनी चलनबदली झाली पाहिजे हे 1923 मध्येच सांगितलं होतं. ती बाबासाहेबांची दूरदृष्टी होती. तयारीनंतरच नोटाबंदी पंतप्रधानांनी नोटांबदीचा निर्णय घेतला. लोक म्हणतात आधी का तयारी केली नाही. असे निर्णय उघडपणे घाययचे नसतात, आता आम्ही नोटबंदी करणार,कामाला लागावे असं सांगून होत नाही. बजेट पण सिक्रेट ठेवलं जातं. बजेट मंडण्याआधी 5 मिनिटं आधी कॅबिनेटसमोर येतं त्यामुळे नोटबंदीसाठी जी तयारी करायची होती ती 2 वर्षापूर्वीच केली होती. 85% चलन बदलत आहोत तरीही लोकांनी निर्णय मान्य केला, मागे उभे राहिले. याचा अर्थ त्रास झाला तरी चालेल पण काळा पैसा बाहेर आला पाहिजे, ही जनतेची भूमिका आहे. मूठभर लोकांकडेच मोठ्या नोटा 500 आणि 1000 च्या नोटा अनेकांकडे नाहीत,मूठभर लोकांकडे त्या आहेत. या निर्णयाची तयारी 2 वर्षापूर्वीच झाली होती, असं मुख्यमंत्री म्हणाले. मनमोहन अर्थतज्ज्ञ, मोदी जमिनीवरचे नेते माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी प्रत्येक व्यक्तीचं बँक खातं असावं असं म्हटलं होतं. मोदी हे अर्थतज्ज्ञ नसले तरी ते जमिनीवर काम करणारे नेते आहेत. त्यांनी 23 कोटी जनधन खाती उघडली. पहिली दोन वर्षे तयारी केली. डिजिटल इंडियाची तयारी केली. पहिल्या दिवशी काळा पैसा संपवण्याचा निर्धार केला.  कॅशलेस बँकिंग पण पहिल्याच दिवशी सांगितलं होतं. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातले इतर मुद्दे :

2011-12 वर्षात चलनात खोट्या नोटा , शंभरच्या 15 लाख नोटा, पाचशेच्या 42 लाख नोटा, तर एक हजारच्या 22 लाख नोटा फोर्ब्स, वॉशिंग्टन पोस्ट, वर्ल्ड बँकेकडूनही पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचं कौतुक आणि पाठिंबा या देशात काळा पैशाविरोधात इतक्या ताकदीने पहिल्यांदा कायदा तयार झाला, त्यासाठी हिंमत लागते नोटाबंदीनंतर तिसऱ्या दिवशी बाजार समित्यांमध्ये कॅशलेस व्यवहार सुरु, एकही तक्रार नाही रब्बी पिकांच्या पेरण्यांत गेल्या वर्षीच्या तुलनेत 109 टक्क्यांनी वाढ खाजगी रुग्णालयांना चेक घेण्याची विनंती, चेक बाऊन्स झाला तर आम्ही 10 हजार रुपयांचा निधी देऊ नेहमी पेक्षा जास्त पैसे ग्रामीण भागात पाठवला, एक दिवसाआड बैठक घेतली, राज्यात जास्तीत जास्त कॅश येण्यासाठी प्रयत्न केला महा वॉलेट तयार करणारं देशातील पहिलं राज्य, त्याच्या माध्यमातून व्यवहार करता येतील निर्णयाला नावं ठेवून चालणार नाही, अडचणी येतील, मात्र देशातील लहानसहान लोकांचीही अडचण सहन करण्याची तयारी पुण्यात नोटाबंदीच्या समर्थनार्थ मोर्चा निघाला, त्यातील गरिबांच्या प्रतिक्रिया बघा, सामान्य माणसाने पाठिंबा दिला सहकारी बँकांमध्ये व्यवहार नाही म्हणून अडचण, हे व्यवहार सुरु झाले पाहिजेत, अशी आमची भूमिका नोटाबंदीनंतर काश्मीरमध्ये दगडफेक झाली नाही, गेल्या महिन्यात सर्वात जास्त नक्षलींचं समर्पण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निर्णय नाही, मोदीच म्हणतात निवडणुका येतात-जातात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mirzapur Season 3 OTT Release :  'मिर्झापूर 3'  प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
'मिर्झापूर 3' प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pandharpur : विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्यात बसवली चांदीची मेघडंबरीNagpur : बोगस शेतकऱ्यांनी पैसे लाटल्याचं उघड; Ambadas Danve संतापले, म्हणाले...TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 05 JULY 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mirzapur Season 3 OTT Release :  'मिर्झापूर 3'  प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
'मिर्झापूर 3' प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Vasant More: तुम्ही प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात केलाय, वसंत मोरेंविरोधात वंचित आक्रमक, पुण्यात मोर्चा काढणार
तुम्ही प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात केलाय, वसंत मोरेंविरोधात वंचित आक्रमक, पुण्यात मोर्चा काढणार
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांची प्रचंड धावपळ; नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय, म्हणाले...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांची प्रचंड धावपळ; नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय, म्हणाले...
Embed widget