एक्स्प्लोर

नवी मुंबई एपीएमसीत व्यापाऱ्यांकडून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची लूट

नवी मुंबई एपीएमसीमध्ये मराठवाड्यातून आलेल्या 60 ते 70 शेतकऱ्यांचा मोसंबीचा माल पड्या दरात घेणाऱ्या व्यापाऱ्यांचा डाव शेतकऱ्यांनी हाणूण पाडला आहे.

नवी मुंबई : पावसाने पाठ फिरवली असतानाही शेतकरी कसाबसा पीक जगवत आहे. पण व्यापाऱ्यांकडून मात्र शेतकऱ्यांची पिळवणूक सुरुच आहे. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मध्ये मराठवाड्यातून आलेल्या 60 ते 70 शेतकऱ्यांचा मोसंबीचा माल पड्या दरात घेणाऱ्या व्यापाऱ्यांचा डाव शेतकऱ्यांनी हाणूण पाडला आहे. बाजार समितीच्या नियमानुसार किलोप्रमाणे भाव देण्याची पद्धत आहे. पण व्यापाऱ्यांनी पेटीतून सुट्टा माल घेत पैसे दिले आणि त्यातूनही 10 टक्के कपात केली. या व्यापाऱ्यांवर कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासाठी त्यांनी मोसंबी, संत्र्यांचे व्यवहार बंद पाडले. नवी मुंबई एपीएमसीत व्यापाऱ्यांकडून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची लूट मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीडमधून आपला शेतीमाल घेऊन शेतकरी नवी मुंबईतील एपीएमसीमध्ये आले. औरंगाबादमध्ये मोसंबी, संत्री यांना चांगली किंमत मिळत नसल्याचे वाशीतील एपीएमसीमध्ये दरात वाढ होईल या आशेने शेतकऱ्यांनी थेट मुंबईचं प्रवेशद्वार गाठलं. नवी मुंबई एपीएमसीत व्यापाऱ्यांकडून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची लूट 60 ते 70 गाड्या भरुन आलेला माल विकण्याचा प्रयत्न केला असता एपीएमसीमधील होलसेल व्यापारी वर्गाकडून शेतकऱ्यांची घोर निराशा झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमानुसार शेतकऱ्यांचा माल घेताना किलो प्रमाणे घेणं बंधनकारक आहे. पण व्यापारी येथील होलसेल पाटीचं प्रमाण लावून डझनावारी माल घेत होते. पाटीवर किंमत ठरवली जात असल्याने याचं शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागत आहे. योग्य किंमत हाती येत नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. किलोला भाव मिळाल्यास तीप्पट ते चौपट फायदा शेतकऱ्यांच्या झोळीत पडणार होता. पण व्यापाऱ्यांनी हा सर्व नफा आपल्या खिशात टाकला. विशेष म्हणजे खरेदी केलेल्या शेती मालाचे पैसे देताना परत एकदा 10 टक्के कमिशन कापलं जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. नवी मुंबई एपीएमसीत व्यापाऱ्यांकडून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची लूट पणन विभागाच्या कायद्यानुसार, एपीएमसीमध्ये मालाची समोरासमोर खरेदी करण्याचा नियम आहे. शेतकऱ्यांना त्यांचा माल कोणत्या किंमतीत विकला जात आहे याची माहिती समोरासमोर होण्यासाठी हा कायदा करण्यात आला. मात्र याही कायद्याला फाटा देत व्यापारी वर्गाकडून रूमालाखाली हात धरून किंमत ठरवली जाते. यामुळे शेतमालाला किती किंमत मिळाली याची माहिती मिळत नसून थेट बिल हाती थोपवलं जातं. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. नवी मुंबई एपीएमसीत व्यापाऱ्यांकडून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची लूट आपला माल विकताना फसवणूक होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी एपीएमसी प्रशासनाकडे केली आहे. शेतकऱ्यांचा माल न विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत एपीएमसी प्रशासनाने दिले आहेत. नियमाला बगल देऊन शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना नोटीस दिली जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार

व्हिडीओ

MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
NEET Paper Leak: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिल्या सुनावणीत काय घडलं? सुनावणी थेट 3 ऑगस्टला होणार,नेमकं कारण काय?
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिली सुनावणी लांबणीवर, नेमकं कारण काय?
Indigo Flight Emergency Landing: दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
Embed widget