एक्स्प्लोर

Four Legged Pullet : वजनदार अंड्यानंतर आता कोल्हापुरात चार पायाच्या कोंबडीच्या पिल्लाची चर्चा!

Four Legged Pullet in Kolhapur : पुन्हाळा तालुक्यातील बोरीवडेत एका कोंबडीने चक्क चार पायाच्या पिल्याला जन्म दिला आहे. विशेष म्हणजे हे पिल्लू सुखरुप आहे. ही दुर्मिळ घटना असल्याचे मानले जात आहे.

Four Legged Pullet in Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात एक महिनाभरापूर्वी देशातील सर्वात वजनदार अंड्याची चर्चा झाल्यानतंर आता चार पाय असलेल्या कोंबडीच्या पिल्लाची (Four Legged Pullet) चर्चा रंगली आहे. जिल्ह्यातील पुन्हाळा तालुक्यातील बोरीवडेत एका कोंबडीने चक्क चार पायाच्या पिल्याला जन्म दिला आहे. विशेष म्हणजे हे पिल्लू सुखरुप आहे. ही दुर्मिळ घटना असल्याचे मानले जात आहे. या पिल्लाला इतर असणारे दोन पायांसह मागील बाजूस दोन असे एकूण 4 पाय आहेत.

बोरीवडे गावातील सखाराम हिंदूराव शिंदे यांच्या कोंबडीने 12 पिल्लांना जन्म दिला. या 12 पिल्लांपैकी 11 पिल्लांचे दोन  दोन पाय आहेत. मात्र, एकाला चार पाय आहेत. चार पायाचे पिल्लू पाहून शिंदे कुटुबिंयाना प्रथमता आश्चर्याचा धक्का बसला. विशेष म्हणजे हे पिल्लू जिवंत आहे. ही घटना अत्यंत दुर्मिळ असल्याचे पशुवैधकीयांच्यातुन सांगण्यात येते . दरम्यान हे चार पायाचे पिल्लू बोरीवडे परिसरात चर्चेचा विषय बनले आहे.

महाजम्बो आणि वजनदार अंड्याची सुद्धा कोल्हापुरात एकच चर्चा! 

दरम्यान, महाजम्बो अंड हा शब्द ऐकून आपल्याला आश्चर्य वाटला असेल, पण देशातील सगळ्यात मोठे आणि वजनदार अंडे कोल्हापुरातील एका पोल्ट्रीमध्ये आढळून आलं  होतं. या अंड्याचे वजन 210 ग्रॅम आहे. त्यामुळे हे देशातील महाजम्बो आणि वजनदार अंडं ठरलं आहे. एक महिन्यांपूर्वी ही घटना घडली होती. हे महाजम्बो अंडं कोल्हापूर जिल्ह्यातील तळसंदे गावात दिलीप चव्हाण यांच्या पोल्ट्रीमध्ये सापडलं होतं. सर्वसाधारण अंडं ते जम्बो अंडं आणि आता महाजम्बो अंडं असा हा प्रवास झाला आहे. दिलीप चव्हाण गेल्या 40 वर्षांपासून या व्यवसायात आहेत, पण अशा पद्धतीचे अंडे त्यांनी कधी पाहिलेलं नाही.

देशात आतापर्यंत 162 ग्रॅम वजनाचे कोंबडीचे अंडे पंजाबमध्ये सापडलं होते. त्याची लिम्का बुकमध्ये नोंद झाली आहे. तर 500 ग्रॅमचे अंडे परदेशात सापडलं होतं, पण आपल्या देशातील हे सर्वात मोठं अंडं आहे. दरम्यान, अशा पद्धतीने कोंबडीने एखादा अंडे दिलं तर ते खूप नाजूक किंवा कवच नसलेले असतं. 

सामान्य अंड्याचे वजन किती असते?

सर्वसाधारणपणे 50 ते 70 ग्रॅम वजनाचे अंडी असतात. त्यामध्ये कवच सोडून (Without Shell) 50 ग्रॅम वजन असते. पांढरा बलक (White Only) 30 ग्रॅम असतो, तर पिवळा बलक (Yolk Only) 18 ग्रॅम असते. 

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Embed widget