एक्स्प्लोर

Bhagat Singh Koshyari : राज्यपालांना परत बोलवून पूर्णवेळ आरएसएससाठी नेमा! राष्ट्रवादीकडून कागलमध्ये जोडे मारो आंदोलन 

महाराष्ट्रात आल्यापासूनच महापुरुषांवर बोलून वादाची मालिकाच सुरु केलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या प्रतिमांना कागलमध्ये जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

Bhagat Singh Koshyari : महाराष्ट्रात आल्यापासूनच महापुरुषांवर बोलून वादाची मालिकाच सुरु केलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या प्रतिमांना कागलमध्ये जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. कागल बस स्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने म्हणाले की, महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे आरएसएस पुरस्कृत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाची त्यांनी सुपारीच घेतली आहे. आरएसएस पुरस्कृत असलेल्या भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचीही भर पडली आहे. महाराष्ट्रातील जनता हे खपवून घेणार नाही.       

कोश्यारींना मागे बोलवा

प्रताप उर्फ भैय्या माने पुढे म्हणाले की, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) हे राज्यपाल पदापेक्षा आरएसएसचा अजेंडाच नेटाने राबवत आहेत. केंद्र सरकारने त्यांना परत बोलावून घेऊन आरएसएसच्या पूर्णवेळ कामासाठी राज्यपाल पदातून मुक्त करावे.  

यावेळी कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील, कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजय चितारी, नगरसेवक प्रवीण काळबर, सुनील भिऊंगडे, रणजित पाटील, उत्तम कांबळे, बच्चन कांबळे, इरफान मुजावर, नवाज मुश्रीफ, राहूल पाटील, शहानूर पखाली, संग्राम लाड, राहूल चौगुले, गुलाब गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.

काय म्हणाले होते कोश्यारी?

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी  यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. शिवाजी महाराज तर जुने युगाचे हिरो, डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. गडकरीपर्यंत नवीन युगाचे हिरो असल्याचे कोश्यारी म्हणाले. औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 62 वा दीक्षान्त समारंभ पार पडला, यावेळी बोलतांना कोश्यारी यांनी हे विधान केले. त्यांच्या याच विधानाला आता विरोध होत आहे. 

कोश्यारी नावाचं पार्सल या महाराष्ट्रातून परत पाठवा

राज्यपाल यांच्या विधानावरून राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना, संभाजी ब्रिगेडसह संभाजीराजे यांच्याकडून निषेध करण्यात आला असून, त्यांच्यावर टीका देखील करण्यात येत आहे. 

शिवरायांचा अपमान भाजपला मान्य आहे का?

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफिच्या मुद्यावरून राज्यातील राजकारण तापले असताना दुसरीकडे भाजप प्रवक्त्यांनी शिवाजी महाराजांनी औरंगजेबाकडे पाच वेळेस माफी मागितली असल्याचे वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. औरंगजेबाची माफी शिवाजी महाराजांनी मागितली असं विधान भाजपच्या प्रवक्त्यांनी केलंय, हे भाजपला मान्य आहे का? असा सवाल करताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी राज्यपालांना पुन्हा माघारी पाठवण्याची मागणीदेखील राऊत यांनी केली आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hasan Mushrif On Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार का? मुश्रीफ काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Update : सैफवरील हल्लेखोर वरळीच्या सिल्कवर्क्स कॅफेमध्ये होता कामाला, इतर कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यातSaif Ali Khan Attacker Update : सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं वरळीतील कोळीवाड्यात वास्तव्य, आरोपीचे शेजारी काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget