एक्स्प्लोर

Rajesh Tope : "भाजपच्या पक्ष फोडणीला नेते बळी पडले हे..."; राष्ट्रवादीच्या शिबिरात राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य

Rajesh Tope : आपल्याला निष्ठेची ज्योत तेवत ठेवणे आवश्यक आहे. आपल्या पक्षाच्या दृष्टीने शक्ती स्थळ व आश्वासक चेहरा हे आदरणीय पवार साहेब आहेत व तेच या क्षेत्रातले बाप माणूस आहेत.

Rajesh Tope शिर्डी : राजकारणातील (Maharashtra Politics) कुठेतरी निष्ठा व नैतिकता लोप पावत असताना आजचा हा विचार अत्यंत महत्वाचा आहे. मला या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करायचे आहे. आपल्या स्वाभिमानी बाण्याला मनापासून सलाम करायचे आहे. सह्याद्री कधी हिमालयापुढे झुकला नाही, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांनी आपल्याला स्वाभिमानाने जगण्याचा विचार दिला. भारतीय जनता पक्षाच्या (BJP) पक्ष फोडणीला नेते बळी पडले हे महाराष्ट्राच्या अस्मितेच्या दृष्टीने अत्यंत खेदजनक बाब असल्याचे वक्तव्य राज्याचे माजी मंत्री आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केले. 

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डी येथील शिबिरात राजेश टोपे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. राजकारणाच्या गढूळ वातावरणात निष्ठावान व चांगले लोक राहावेत हे मतदार बघत आहेत. निष्ठेच्या दृष्टिकोनातून आपल्या पक्षाचे महत्व वेगळे आहे, त्यामुळे आपल्याला निष्ठेची ज्योत तेवत ठेवणे आवश्यक आहे. आपल्या पक्षाच्या दृष्टीने शक्ती स्थळ व आश्वासक चेहरा हे आदरणीय पवार साहेब आहेत व तेच या क्षेत्रातले बाप माणूस आहेत, असे ते म्हणाले. 

पवार साहेब एक विचारधारा

राजेश टोपे पुढे म्हणाले की, शरद पवार साहेब एक व्यक्ती नाहीत तर ती एक विचारधारा आहे, त्यामुळे या विचारांना अनुसरून आपण आपल्या पक्षाला विजयाकडे घेऊन जायचे आहे. साहेबांनी नेहमी शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांना धरून काम केले.

साहेबांना तरुण पिढीवर विश्वास

आज आपला देश सातत्याने धार्मिक मुद्द्यांवर राजकारण करत आहे. माणसात माणूसपण ठेवत नाहीये म्हणून 'देश गलत लोग चला रहे है' अशी परिस्थिती आहे. या विचारधारेला विरोध करण्यासाठी पवार साहेब काम करत आहेत, त्यांना साथ देण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे. साहेबांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्याला एकत्रितपणे लढले पाहिजे. साहेबांना तरुण पिढीवर विश्वास आहे व त्यांना त्यांच्यातच आपल्या पक्षाचे भविष्य दिसत आहे. साहेबांनी आपल्या रक्तात भिनलेल्या पुरोगामी विचारांनी राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहे.

जातीवाद व महागाईवर बोलणे गरजेचे

शरद पवार साहेबांच्या विचारांना पाईक असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. तरुणांसाठी या सरकारने काय केले? सर्व मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला जात आहेत, यासाठी गावागावातील तरुणांना जागरूक करण्याचे काम केले पाहिजे. राज्यामध्ये नोकर भरती केली जात नाही, आरोग्यासारख्या महत्वाच्या विभागामध्येदेखील नोकर भरती होत नाही. जातीवाद व महागाई यांसारख्या गोष्टींवर बोलण्याची अत्यंत गरज आहे. सध्या हे लोक फार खूणशी राजकारण करत आहेत, आपल्याला संघर्ष करावे लागेल. पवार साहेबांसारखे उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्या सोबत असताना आपण घाबरून जाण्याचे काम नाही, आपल्याला धाडसी वृत्ती मनामध्ये ठेवावी लागेल, असेही यांनी म्हटले. 

इतर महत्वाच्या बातम्या

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी; नाशकात शिवसेना शिंदे गट आक्रमक

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

HSC SSC Marksheet Update : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांचा जात प्रवर्ग, शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरणKolkata Sanjay Roy Found Guilty : कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण, संजय रॉय दोषीABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Embed widget