एक्स्प्लोर
Advertisement
जयकुमार रावल यांच्यापासून माझ्या जीविताला धोका : माजी मंत्री
जयकुमार रावल हे राज्याचे रोहयो, पर्यटनमंत्री आहेत, तर हेमंत देशमुख हे राज्याचे माजी कामगार मंत्री आहेत. हे दोघेही एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत.
धुळे : राज्याचे रोहयो आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यापासून माझ्या जीविताला धोका आहे, असा गंभीर आरोप राज्याचे माजी मंत्री हेमंत देशमुख यांनी केला आहे. माझ्या जीवाला काही झाल्यास, जयकुमार रावल आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना आरोपी करावे, अशा आशयाचे पत्र हेमंत देशमुखांनी राज्यपालांना पाठवलं आहे.
हेमंत देशमुख यांनी नेमका काय आरोप केला आहे.
“राज्याचे रोहयो, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्यापासून आपल्या जीविताला धोका आहे, खोट्या केसेस करुन त्यात अडकवून जेलमध्ये टाकायचे, तेथे विषप्रयोग करुन किंवा अन्य अनैसर्गिक मार्गाने मृत्यू आल्यास अथवा माझ्यावर मारेकरी घालून गोळ्या घेतल्या तर यात पहिले आरोपी जयकुमार रावल, दुसरे आरोपी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करुन इतरांना आरोपी करावे”, असे गंभीर आरोप हेमंत देशमुख यांनी केले असून, त्यांनी यासंदर्भात राज्यपालांना पत्रही पाठले आहे. हेमंत देशमुख यांनी पत्रकार परिषदेत यासंबंधी माहिती दिली.
जयकुमार रावल हे राज्याचे रोहयो, पर्यटनमंत्री आहेत, तर हेमंत देशमुख हे राज्याचे माजी कामगार मंत्री आहेत. हे दोघेही एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत.
दोंडाईचा नगर परिषदेच्या नव्या वास्तूचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होण्यापूर्वीच हेमंत देशमुख समर्थकांनी या इमारतीचे उदघाटन केले होते. या घटनेवरुन दोंडाईचातील राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. यानंतर मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्दही झाला होता. मुख्यमंत्र्यांचा दोंडाईचा दौरा मराठा आरक्षण आंदोलनामुळे रद्द झाला, असा दावा हेमंत देशमुख यांनी धुळ्यात पत्रकार परिषदेत केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
Advertisement