एक्स्प्लोर

Sudhir Mungantiwar : वन्‍य प्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात गाय, म्‍हैस, बैलाचा मृत्‍यू झाल्‍यास 70 हजार रुपयांची मदत मिळणार : सुधीर मुनगंटीवार

वन्‍य प्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात मृत पावलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या कुटुंबियांना देण्‍यात येणाऱ्या अर्थसहाय्याच्‍या रकमेत वाढ करण्यात आली आहे.

Sudhir Mungantiwar : वन्‍य प्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात मृत पावलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या कुटुंबियांना देण्‍यात येणाऱ्या अर्थसहाय्याच्‍या रकमेत वाढ करण्यात आली आहे. पूर्वी 15 लाख रुपयांचे अर्थसहाय्य केलं जातं होतं, आता यामध्ये वाढ करुन ते 20 लाख रुपये करण्यात आलं आहे. तसेच वन्‍य प्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात गाय, म्‍हैस, बैल यांचा मृत्‍यू झाल्‍यास देण्‍यात येणाऱ्या 60 हजार रूपयांच्या रकमेत वाढ करुन ती 70 हजार रूपये करण्‍यात आली आहे. याबाबतचा निर्णय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी विधान परिषदेत जाहीर केला. 

2021-22 मध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात 86 जणांचा मृत्यू

राज्‍याच्‍या वनविभागाच्‍या माध्‍यमातून उत्‍तम पद्धतीने वनसंवर्धनाचे कार्य सुरु असल्‍याने वन्‍यप्राण्‍यांच्‍या संख्‍येत मोठया प्रमाणावर वाढ झाली आहे. मानव आणि वन्‍यजीव संघर्ष कमी करण्‍याच्‍या दृष्‍टीने वनालगतच्‍या गावांमध्‍ये राहणाऱ्या नागरिकांचे वन विभागामार्फत प्रबोधन करण्‍यात येत आहे. डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेमार्फत स्‍थानिक जनतेचे वनावरील अवलंबीत्‍व कमी करण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात येत आहे. वन्‍य प्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यामध्‍ये सन सन 2019-20 या वर्षी 47 तर 2020-21 ला 80 आणि 2021-22 ला 86 इतकी मनुष्यहानी झाल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे. मनुष्‍यहानी झालेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या अवलंबित कुटुंबियांना वाघ, बिबट्या, रानडुक्‍कर, गवा, अस्‍वल, लांडगा, कोल्‍हा, हत्‍ती व रानडुकरे यांच्‍या हल्‍ल्‍यात होणाऱ्या मनुष्‍यहानीमुळे देण्‍यात येणाऱ्या अर्थसहाय्याच्‍या रकमेत वाढ करण्‍याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे 15 लाखांऐवजी 20 लाखांचे अर्थसहाय्य देण्‍यात येणार आहे. 


Sudhir Mungantiwar : वन्‍य प्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात गाय, म्‍हैस, बैलाचा मृत्‍यू झाल्‍यास 70 हजार रुपयांची मदत मिळणार  : सुधीर मुनगंटीवार

कायम अपंग झाल्‍यास 5 लाखांची मदत

दरम्यान, अर्थसहाय्य मिळणाऱ्या 20 लाखापैकी 10 लाख रुपये देय असलेल्‍या व्‍यक्‍तीला तत्‍काळ धनादेशाद्वारे आणि उर्वरित रक्‍कम रुपये 10 लाख त्‍यांच्‍या राष्‍ट्रीयकृत बॅंकेत असलेल्‍या दरमहा व्‍याज देणाऱ्या संयुक्‍त खात्‍यामध्‍ये ठेव रक्‍कम अर्थात फिक्‍स डिपॉझीट जमा करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे. व्‍यक्‍ती कायम अपंग झाल्‍यास 5 लाख तर व्‍यक्‍ती गंभीररित्‍या जखमी झाल्‍यास 1 लाख 25 हजार इतके अर्थसहाय्य देण्‍यात येणार आहे. व्‍यक्‍ती किरकोळ जखमी झाल्‍यास औषधोपचारासाठी येणारा खर्च देण्‍यात येणार असून खासगी रूग्‍णालयात औषधोपचार करणे अगत्‍याचे असल्‍यास त्‍याची मर्यादा 20 हजार प्रती व्‍यक्‍ती इतकी राहणार आहे.

गाय, म्‍हैस, बैल यांचा मृत्‍यू झाल्‍यास 70 हजार रुपयांची मदत

वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात गाय, म्‍हैस, बैल यांचा मृत्‍यू झाल्‍यास देण्‍यात येणाऱ्या 60 हजार रुपये इतक्‍या रकमेत वाढ करुन ती 70 हजार रूपये इतकी करण्‍यात आली आहे. मेंढी, बकरी व इतर पशुधन यांचा मृत्‍यु झाल्‍यास देण्‍यात येणाऱ्या 10 हजार रूपये इतक्‍या रकमेत वाढ करून 15 हजार रूपये इतकी वाढ करण्‍यात आली आहे. गाय, म्‍हैस, बैल या जनावरांना कायम अपंगत्‍व आल्‍यास देण्‍यात येणारी 12 हजार इतकी रक्‍कम वाढवून 15 हजार करण्‍यात आली आहे. तसेच गाय, म्‍हैस, बैल, मेंढी, बकरी व इतर पशुधन जखमी झाल्‍यास देण्‍यात येणारी 4 हजार ची रक्‍कम 5 हजार इतकी करण्‍यात आली आहे. वन्‍य प्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात होणारी मनुष्‍यहानी आणि त्‍यामुळं संबंधित कुटुंबियांची होणारी आर्थिक परवड लक्षात घेता त्‍या पार्श्‍वभूमीवर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेला हा निर्णय महत्‍वपूर्ण मानला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

मानव आणि वन्यप्राणी संघर्षाची स्थिती दिवसेंदिवस बिकट! अहवालातील कटू सत्य... 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Congress Candidate List : दिग्रसच्या जागेसाठी ठाकरे अन् काँग्रेसमध्ये तह, तगडा उमेदवार रिंगणात, मंत्री संजय राठोड यांचं टेन्शन वाढणार
दर्यापूरच्या बदल्यात दिग्रसची जागा घेतली, काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे मैदानात, संजय राठोड यांचं टेन्शन वाढणार
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sada Sarvankar on Amit Thackeray : अमित ठाकरेंसाठी जागा सोडणार? सदा सरवणकर पहिल्यांदाच बोलले!Israel Iran  Special Reportइस्त्रायलचा इराणवर सर्वात मोठा हल्ला, इराणमधल्या तीन प्रांतावर मोठा हल्लाAmit Thackeray Mahim Special Report : माहीमबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार?Shiv sena Vs NCP Politics : 2 राष्ट्रवादी विरुद्ध 2 शिवसेना; राज्यात राजकीय महाभारत Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress Candidate List : दिग्रसच्या जागेसाठी ठाकरे अन् काँग्रेसमध्ये तह, तगडा उमेदवार रिंगणात, मंत्री संजय राठोड यांचं टेन्शन वाढणार
दर्यापूरच्या बदल्यात दिग्रसची जागा घेतली, काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे मैदानात, संजय राठोड यांचं टेन्शन वाढणार
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लीम उमेदवार; बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला दिलं तिकीट
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लीम उमेदवार; बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला दिलं तिकीट
राजसाहेबांचा चिरंजीव आहे, भाजपची इच्छा असेल तर अमित ठाकरेंना विधानपरिषद किंवा राज्यसभा द्यावी : समाधान सरवणकर
अमित ठाकरेंनी राज्यसभा, विधानपरिषदेचा विचार करावा, सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा, सरवणकरांच्या लेकाचा सल्ला 
फेसुबक लाईव्ह करत हत्या झालेल्या अभिषेक घोसाळकरांच्या कुटुंबीयास ठाकरेंचा एबी फॉर्म; पण उमेदवार गुलदस्त्यात
फेसुबक लाईव्ह करत हत्या झालेल्या अभिषेक घोसाळकरांच्या कुटुंबीयास ठाकरेंचा एबी फॉर्म; पण उमेदवार गुलदस्त्यात
Satej Patil :  'उत्तर'चं उत्तर अजूनही मिळेना, पण कोल्हापूरच्या जागावाटपात सतेज पाटलांची बाजी! काँग्रेसची पंचमी, पवारांना तीन अन् ठाकरेंना अवघ्या दोन जागा
'उत्तर'चं उत्तर अजूनही मिळेना, पण कोल्हापूरच्या जागावाटपात सतेज पाटलांची बाजी! काँग्रेसची पंचमी, पवारांना तीन अन् ठाकरेंना अवघ्या दोन जागा
Embed widget