Sanjay Rathod | वनमंत्री संजय राठोड यवतमाळ येथील घरी दाखल, थोड्याच वेळात पोहरादेवीसाठी रवाना होणार
वनमंत्री संजय राठोड यांच्या यवतमाळ दौऱ्याचा कार्यक्रम स्थानिक प्रशासनाला प्राप्त झालाय. त्यानुसार संजय राठोड 11 वाजताच्या सुमारास पोहरादेवीमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. समर्थकांनी राठोडांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु केली आहे.
यवतमाळ : गेल्या अनेक दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले वनमंत्री संजय राठोड यवतमाळ येथील घरी दाखल झाले आहेत. गेल्या 15 दिवसांपासून ते माध्यमांसमोर आले नव्हते. थोड्याच वेळात ते यवतमाळ येथून वाशिममधल्या पोहरादेवीसाठी रवाना होणार आहेत. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी अडचणीत सापडलेले संजय राठोड आज मौन सोडणार का? या प्रकरणावर ते नेमकं काय बोलणार, काय भूमिका मांडणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे.
वनमंत्री संजय राठोड यांच्या यवतमाळ दौऱ्याचा कार्यक्रम स्थानिक प्रशासनाला प्राप्त झालाय. त्यानुसार संजय राठोड 11 वाजताच्या सुमारास पोहरादेवीमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. समर्थकांनी राठोडांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु केली आहे.
Pooja Chavan Death Case | संजय राठोड गायब नाहीत, ते संपर्कात आहेत : अजित पवार
#BREAKING वनमंत्री संजय राठोड यवतमाळ शहरातील राहत्या घरी दाखल
राठोड आज पोहरादेवी दौऱ्यावर @SanjayDRathods #संजयराठोड #SanjayRathod पाहा लाईव्ह https://t.co/K4OegoSSYi pic.twitter.com/3XLirpZwAP — ABP माझा (@abpmajhatv) February 23, 2021
कसा आहे संजय राठोड यांचा दौरा?
- सकाळी 9 वाजता : वाशिमच्या मानोरा तालुक्यातील श्री क्षेत्र पोहरागडकडे रवाना होणार
- सकाळी 11.30 वाजता : श्री श्रेत्र पोहरागड इथे आगमन आणि दर्शन
- दुपारी 1 वाजता : दारव्हा तालुक्यातील श्री क्षेत्र मुंगसाजी महाराज संस्थान धामनगाव देवकडे रवाना होणार
- दुपारी 2.30 वाजता : श्री क्षेत्र मुंगसाजी महाराज संस्थान धामनगाव देव इथे आगमन आणि दर्शन
- दुपारी 3.30 वाजता : यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना होणार
- दुपारी 4.30 वाजता : जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन, यवतमाळ जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनेबाबत आयोजित बैठकीला उपस्थित राहणार.
- सोईनुसार : यवतमाळमधील निवासस्थानाकडे रवाना होणार
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण?
मूळची बीडमधल्या परळीची असलेल्या पूजा चव्हाणचा पुण्यातील राहत्या घरातून पडून 7 फेब्रुवारीला मृत्यू झाला. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. इंग्लिश स्पीकिंगच्या क्लाससाठी ती पुण्यात राहात होती. तिने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा संशय आहे. तिच्या आत्महत्येनंतर आत्महत्येशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरु झाली होती. भाजपने तक्रार दाखल केली. शिवाय विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली. त्यातच पूजा चव्हाण आणि कथित मंत्र्यांच्या एक-दोन नव्हे तर तब्बल 12 ऑडिओ क्लिप समोर आल्या. त्यानंतर या ऑडिओ क्लिपमधील आवाज वनमंत्री संजय राठोड यांचाच असल्याचा दावा करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.
संबंधित बातम्या