(Source: Poll of Polls)
12 दिवस नॉट रिचेबल राहिल्यानंतर अखेर वनमंत्री संजय राठोड सहकुटुंब पोहरादेवीत येणार; मंगळवारी पत्रकार परिषद घेण्याची शक्यता
मंगळवारी मंत्री संजय राठोड पत्रकार परिषद घेण्याची शक्यता, पोहरादेवीत महंतांच्या बैठकीनंतर माहिती. तर, पूजाच्या कुटुंबीयांच्या भेटीनंतर तृप्ती देसाईंची सीबीआय चौकशीची मागणी
वाशिम : पोहरादेवी येथे धर्मपीठावर महंतांची बैठक पार पडली. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या अडचणींमध्ये वाढ होतानाचं चित्र दिसत असतानाच आता अखेर अनेक आरोप –प्रत्यारोपांच्या सत्रांमध्ये जवळपास 12 दिवसांपासून नॉट रीचेबल असणारे राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे सहपरिवार 23 फेब्रुवारीला पोहरादेवी येथे धर्मपीठावर येणार आहेत. या संदर्भातील माहिती महंत जितेंद्र महाराज आणि सुनील महाराज यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना दिली.
दोन दिवसांपूर्वी आपण याच ठिकाणी इतरही महंतांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. या बैठकीत संजय राठोड यांनी पोहरादेवीत संतांच्या दर्शनासाठी येत पुन्हा एकदा त्यांनी आपल्या कामाची सुरुवात करावी अशी विनंतीही राठोडांना करण्यात आली. खेर सांगितल्याप्रमाणं संजय राठोड यांच्या कार्यालयाकडून त्यांच्या भेटीची अधिकृत तारीख मिळाल्याचं महंतांकडून सांगण्यात आलं.
23 फेब्रुवारीला मंगळवारी, सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास संजय राठोड हे इथं संपूर्ण कुटुंबासमवेत येणार असल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. इथं विधीवत पूजा संपन्न झाल्यानंतर आणि संतांचं दर्शन झाल्यानंतर धर्मपीठाला भेट दिल्यानंतर ते या ठिकाणहून निघतील असंही सांगण्यात आलं आहे. तेव्हा आता या ठिकाणी राठोड माध्यमांशी संवाद साधण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. असं झाल्यास ते नेमकं काय बोलणार याकडेच साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
Pooja Chavan Death Case | संजय राठोड यांचा राजीनामा कधी? Special Report
माध्यमांशी संवाद साधताना राठोडांच्या पोहरादेवी भेटीबाबत माहिती देणारे जितेंद्र महाराज हे पोहरादेवी बंजारा समाजाच्या धर्मपीठाचे महंत आहेत. पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांचं नाव पुढे आलं होतं, त्यानंतर जे कुणी दोषी असतील त्यांना चौकशीनंतर कायद्यानुसार शिक्षा व्हावी असं मत त्यांनी मांडलं. यावेळी मात्र समाजा चा नेत्याला बदनाम करू नये किंवा समाजाला बदनाम करू नये अशी भूमिका मांडत समाजातील लोकांना शांतता राखण्याचा आवाहन केलं.