एक्स्प्लोर
पाच दिवसांचे बाप्पा निघाले गावाला
मुंबई: मोठ्या आनंदाने आणि उत्साहात घरोघरी आगमन झालेल्या पाच दिवसांच्या बाप्पांना आज विधिवत निरोप दिला जाणार आहे. मुंबईत पाच दिवसांच्या गणरायाचं मोठ्या प्रमाणात विसर्जन होतं. त्यामुळे पालिकेतर्फे विसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांकडून गणपती विसर्जनासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या इतर भागातही पाच दिवसांच्या बाप्पांना विधिवत निरोप देण्यात येईल.
गेल्या सोमवारपासून बाप्पांचे घरोघरी आगमन झाले. बाप्पाच्या आगमनामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. काही भाविकांनी दीड दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. आत आज पाच दिवसांचे बाप्पाचेही विसर्जन होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement