एक्स्प्लोर

चक्रीवादळाच्या धोक्यामुळे मच्छीमारीसाठी गेलेल्या बोटी माघारी फिरल्या!

चक्रीवादळाच्या धोक्यामुळे मच्छीमारीसाठी गेलेल्या बोटी माघारी बोलवण्यात आल्या आहेत. मासेमारीसाठी गेलेल्या सर्व 455 मासेमारी बोटींना मत्स्यव्यवसाय विभागाने संदेश पाठवून तातडीने माघारी बोलवले आहे.

पालघर : अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे पट्टे चक्रीवादळामध्ये परावर्तीत होत आहेत. त्यामुळे पालघर व ठाणे जिल्ह्यातील मासेमारीसाठी गेलेल्या सर्व 455 मासेमारी बोटींना मत्स्यव्यवसाय विभागाने संदेश पाठवून तातडीने माघारी बोलवले आहे. या काळात अरबी समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव या सर्व बोटी मागे बोलवण्यात आल्या आहेत. दरम्यान, शनिवारी मान्सून दोन दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला आहे. सात ते आठ जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज आहे.

केंद्र शासनाने 12 सागरी मैलाच्या पलिकडे 15 जून पर्यंत मासेमारी करण्याची मुभा दिली असली तरी, राज्य शासनाने 31 मे पर्यंतच मच्छिमारांना मासेमारी करण्याचे परवाने दिले होते. टाळेबंदी नंतर काही प्रमाणात मासेमारी सुरू करण्यात आली होती. सध्या पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील 37, सातपाटी येथील 36, एडवण येथील 50, वसई येथील 202 तसेच ठाणे जिल्ह्यातील उत्तन येथील 130 अशा 455 बोटी समुद्रात मासेमारी करीत आहेत. यामध्ये सुमारे 90 दिवस मासेमारी करणाऱ्या बोटींचाही समावेश आहे.

Monsoon 2020 | मान्सून दोन दिवसआधीच केरळमध्ये दाखल : स्कायमेट वेदर

अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळात रुपांतरीत होत असल्याने, मत्स्यव्यवसाय विभागाने सर्व संबंधित मासेमारी संस्था व मच्छिमारांना निरोप पाठवून, मासेमारी करीत असलेल्या सर्व बोटींना तातडीने माघारी आणण्याची संदेश पाठवले आहेत. या अनुषंगाने या बोटी आज सायंकाळपर्यंत किंवा रात्री उशिरापर्यंत परत येतील, असे सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त अजिंक्य पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व मासेमारी बोटींना 31 मे पर्यंत मासेमारी करण्याचा परवाना देण्यात आला असल्याचे त्यांनी पुढे स्पष्ट केले.

मान्सून दोन दिवसआधीच केरळमध्ये दाखल मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती स्कायमेट वेदरने दिली आहे. मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज असताना कालचं केरळच्या समुद्रकिनारी दाखल झाल्याचा दावा स्कायमेटने केला आहे. स्कायमेट वेदर ही हवामानाचा अंदाज वर्तवणारी खासगी संस्था आहे. मागील वर्षी मान्सून आठ दिवस उशिराने म्हणजेच 8 जून रोजी केरळमध्ये पोहोचला होता.

Monsoon Prediction | कोकणसह मुंबई, ठाण्यात 3 ते 5 जूनदरम्यान पावसाचा अंदाज

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Kailas Patil on Pratap Sarnaik: प्रताप सरनाईक म्हणाले, कैलास पाटील हेच ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असतील; आता कैलास पाटलांचं थेट आव्हान, म्हणाले...
प्रताप सरनाईक म्हणाले, कैलास पाटील हेच ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असतील; आता कैलास पाटलांचं थेट आव्हान, म्हणाले...
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Sanjay Gaikwad: शिवसेनेच्या लोकांनी भोळे राहून फायदा नाही, जो भोळा राहील त्याला मित्रपक्ष गडप करू शकतो : संजय गायकवाड
शिवसेनेच्या लोकांनी भोळे राहून फायदा नाही, जो भोळा राहील त्याला मित्रपक्ष गडप करू शकतो : संजय गायकवाड
Wardha Accident News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हिंगणघाटमध्ये भीषण अपघात, ट्रॅव्हल्सची दुचाकीला जोरदार धडक, तीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी अंत
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हिंगणघाटमध्ये भीषण अपघात, ट्रॅव्हल्सची दुचाकीला जोरदार धडक, तीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी अंत

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Embed widget