एक्स्प्लोर

Monsoon 2020 | मान्सून दोन दिवसआधीच केरळमध्ये दाखल : स्कायमेट वेदर

मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज असताना आजच केरळच्या समुद्रकिनारी दाखल झाल्याचा दावा स्कायमेटने केला आहे.

मुंबई : मान्सूनने केरळमध्ये वर्दी दिल्याची माहिती स्कायमेट वेदरने दिली आहे. मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज असताना आजच केरळच्या समुद्रकिनारी दाखल झाल्याचा दावा स्कायमेटने केला आहे. स्कायमेट वेदर ही हवामानाचा अंदाज वर्तवणारी खासगी संस्था आहे. मागील वर्षी मान्सून आठ दिवस उशिराने म्हणजेच 8 जून रोजी केरळमध्ये पोहोचला होता.

स्कायमेट वेदरने यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे. मान्सून आपल्या निर्धारित वेळेच्या आधी म्हणजेच 30 मे रोजीच केरळमध्ये दाखल झाला आहे. पाऊस, ओएलआर व्हॅल्यू, हवेचा वेग इत्यादी अनुकूल आहेत. अखेर भारतीयांच्या चार महिन्यांच्या सणाला सुरुवात झाली, असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान याआधी भारतीय हवामान विभागाने मान्सून 1 जून रोजी केरळच्या समुद्रकिनारी दाखल होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु आयएमडीने गुरुवारी (28 मे) या अंदाजात बदल करत, सध्याची परिस्थिती मान्सूनच्या आगमनासाठी अनुकून बनली आहे. परंतु मान्सून 5 जून रोजी केरळमध्ये पोहोचेल असं म्हटलं होतं.

मान्सून 28 मे रोजी दाखल होईलं, असं भाकित स्कायमेटने वर्तवलं होतं. यामध्ये दोन दिवस आधी किंवा दोन दिवस नंतर असा फरक असेल, असं म्हटलं होतं.

दोन टप्प्यात पावसाचा अंदाज दरवर्षी हवामान विभाग दीर्घकालीन अंदाज दोन टप्प्यांमध्ये जारी करतो. पहिला अंदाज एप्रिल तर दुसरा अनुमान जून महिन्यात वर्तवला जातो. यंदा पाऊस सरासरी राहिल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता.

निम्म्याहून जास्त शेती पावसावर अवलंबून भारतासारख्या कृषीप्रधान देशासाठी मान्सून अतिशय गरजेचा आहे. अर्थव्यवस्थेचा मोठा भाग शेतीवर आधारित आहे. देशात निम्म्याहून जास्त शेती पावसावर अवलंबून आहे. तांदूळ, मका, ऊस, कापूस आणि सोयाबीनसारख्या पिकांसाठी पाऊस अतिशय आवश्यक असतो. भारतात जून ते सप्टेंबर दरम्यान पाऊस पडतो.

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget