एक्स्प्लोर
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंविरुद्ध गुन्हा दाखल

औरंगाबाद : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात पैठणमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मीदर्शनसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकणी निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली.
"मतदानापूर्वीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण त्या रात्री घरात लक्ष्मी येते. त्या लक्ष्मीचा स्वीकार करा", असं वादग्रस्त वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी 17 नोव्हेंबर रोजी पैठणमधील प्रचारसभेत केलं होतं.
रावसाहेब दानवेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा निवडणूक आयोगाचा आदेश
विरोधकांसह शिवसेनेने या विधानावर आक्षेप घेतला. रावसाहेब दानवेंनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या उत्तराने निवडणूक आयोगाचं समाधान झालं नाही. त्यानंतर निवडणूक आयोगाने औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांना काल (बुधवारी) गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. अखेर बुधवारी रात्री उशिरा रावसाहेब दानवेंविरोधात पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. त्यामुळे आता रावसाहेब दानवेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement



















