Weather Update: विदर्भ मराठवाड्यातील 'या ' जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा ; पुढील 2 दिवस कुठे काय स्थिती?
Weather Update: प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील तीन दिवस कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होईल

Weather Update: आज मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. धाराशिव लातूर आणि नांदेड या तीन जिल्ह्यांसह विदर्भातील 6 जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा 'यलो अलर्ट' दिला आहे . दक्षिण महाराष्ट्रातही हलक्या पावसाची शक्यता आहे . पावसाचा जोर हळूहळू दक्षिण मध्य महाराष्ट्र व कोकणाकडे वाढणार असून पुढील चार दिवस बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागणार असल्याचं IMD ने सांगितलंय .
प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील तीन दिवस कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होईल .बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण असेल .हलक्या व मध्यम पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे .
पुढील 4 दिवस राज्यात कुठे काय स्थिती ?
हवामान विभागाने पुढील दोन दिवस काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचे येलो अलर्ट दिले आहेत .यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी राहण्याची शक्यता आहे .विदर्भात पावसाचा जोर पुढील दोन ते तीन दिवस कायम राहणार असून त्यानंतर पाऊस ओसरणार आहे .
3 ऑगस्ट : अमरावती, नागपूर, भंडारा ,गोंदिया, गडचिरोली ,चंद्रपूर, नांदेड लातूर धाराशिव
4 ऑगस्ट : नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली,सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड
5 ऑगस्ट : वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर ,धाराशिव, सोलापूर, सांगली
6ऑगस्ट : बीड, परभणी, नांदेड ,लातूर, धाराशिव, सोलापूर ,सातारा ,सांगली, कोल्हापूर ,सिंधुदुर्ग
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस, ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 3, 2025
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/4XUXUXDYEx
राज्यभरात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने चांगली हजेरी लावल्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यात अन पावसाचा खेळ सुरू आहे . बहुतांश ठिकाणी पावसाची उघडीप आहे . तर काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे . पुढील 4 दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचे इशारे देण्यात आले आहेत . मराठवाड्यात काही जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींची शक्यता असून तळ कोकण व दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर हळूहळू वाढणार आहे .























