एक्स्प्लोर

अखेर शोधकार्य संपवून टी डी आर एफ ठाण्यात दाखल, फुलांच्या वर्षावात करण्यात आले स्वागत

 चार दिवसांच्या अथक परिश्रमानंतर हे जवान आज ठाण्यात परतले. आज ते परतल्यावर ठाण्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संतोष कदम आणि इतर जवानांनी त्यांचे फुलांनी स्वागत केले.

 ठाणे : महाडमधील तळीये गावात दरड कोसळली तो भाग अतिदुर्गम… आणि ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी तुफान पाऊस, पूरस्थ‍िती आणि असंख्य अडचणी असतानाही एनडीआरएफ जवानांच्याही अगोदर ठाण्यातील एक जवानांचे दल घटनास्थळी पोहचले.  मदत कार्याला लागले आणि  निसर्गाच्या रौद्र रुपासमोर निधड्या छातीने सामोरे गेले, गांवकऱ्यांना धीर दिला, त्या जवानांचे आज सर्वत्र कौतुक होत आहे, ते जाबाज जवान होते… ठाणे महापालिकेच्या आपत्ती प्रतिसाद दलाचे(TDRF).

 चार दिवसांच्या अथक परिश्रमानंतर हे जवान आज ठाण्यात परतले. 13 जणांच्या या पथकाने अतुलनीय असे काम केले आहे. आज ते परतल्यावर ठाण्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संतोष कदम आणि इतर जवानांनी त्यांचे फुलांनी स्वागत केले. या जवानांचे अनुभव थरारक आहेत. ज्यावेळी ते महाडच्या त्या अतिदुर्गम गावाकडे निघाले त्यावेळी एकही रस्ता जाण्यायोग्य नव्हता. पाणी भरलेल्या, दरड कोसळलेल्या रस्त्यातून 8 किमी उंच चढाई करत हे जवान त्या गावात पोचले. तिथे पोचल्यावर देखील जेसीबी, पोकलेन सारख्या मोठ्या मशीन तिथपर्यंत पोचू शकत नसल्याने त्यांनी हातानेच ढीग उपसायला आणि बचावकार्याला सुरुवात केली. "ज्या ठिकाणी दरड कोसळली होती तिथे कमरे पर्यंत चिखल होता. अशा कमरेपर्यंत चिखलात उतरून आम्ही शोधकार्य सुरू केले आणि पहिल्या अर्ध्या तासातच आम्हाला 6 महिन्याच्या चिमुकलीचे शव सापडले, त्यानंतर तिथून 2 किमी पुढे पर्यंत मृतदेह आम्हाला सापडले, एकूण 12 मृतदेह आम्ही शोधून काढले", असे या जवानांचा प्रमुख सचिन याने एबीपी माझाला सांगितले. 

चिखलात पायाखाली काय येते याचा नेम नव्हता. त्यामुळे गम बूट घालून देखील अनेकांच्या पायाला खिळे, पत्रे, काचा आणि असंख्य गोष्टी लागल्याने जखमा झाल्या. त्याही परिस्थितीत त्यांनी शोधकार्य सुरू ठेवले. दोन दिवसांनी एन डी आर एफ तिथे दाखल झाली. तेव्हा त्यांच्या मदतीने शोधकार्य या जवानांनी केले. मात्र दरड पडून 3 दिवस उलटल्यानंतर शोधकार्य थांबवण्यात आले. त्यामुळे हे जवान ठाण्यात परतले. ही दुर्घटना ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्या गावीच झाल्याने, त्यांनी देखील या जवानांचे खूप कौतुक केले. 

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: नागपुरात आज पर्यावरणवादी थाळी बजाओ आंदोलन; सयाजी शिंदेही सहभागी होणार
Maharashtra Live News Updates: नागपुरात आज पर्यावरणवादी थाळी बजाओ आंदोलन; सयाजी शिंदेही सहभागी होणार
Gokul Election Result 2026: गोकुळ दूध संघाच्या घडामोडीत आणखी एक लेटर बॉम्ब; चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र समोर येताच खळबळ
गोकुळ दूध संघाच्या घडामोडीत आणखी एक लेटर बॉम्ब; चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र समोर येताच खळबळ
Buldhana Khadakpurna Dam: बुलढाण्यातील 160 TMC क्षमता असलेला खडकपूर्णा प्रकल्प कोरडाठाक! चार शहरांसह 40 गावांवर तीव्र पाणीटंचाईची टांगती तलवार
बुलढाण्यातील 160 TMC क्षमता असलेला खडकपूर्णा प्रकल्प कोरडाठाक! चार शहरांसह 40 गावांवर तीव्र पाणीटंचाईची टांगती तलवार
Gondia News: वाघांच्या भ्रमणमार्गात वीजवाहिनीचा घाट; तब्बल 5,152 झाडांवर कुऱ्हाड! वन्यजीवप्रेमींसह शेतकऱ्यांचा आक्षेप, रायपूर ते तिरोडापर्यंतच्या वीजवाहिनीवरून संघर्षाची चिन्ह
वाघांच्या भ्रमणमार्गात वीजवाहिनीचा घाट; तब्बल 5,152 झाडांवर कुऱ्हाड! वन्यजीवप्रेमींसह शेतकऱ्यांचा आक्षेप, रायपूर ते गोंदियाच्या तिरोडापर्यंतच्या वीजवाहिनीवरून संघर्षाची चिन्ह

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
Mumbai Accident: रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
Embed widget