एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हावा, शेतमालाला देश - विदेशात योग्य प्रकारे भाव मिळावा : सत्तार

शेतकरी उत्पादक संस्था अधिक बळकट, सक्षम व्हावी यासाठी त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासनाच्यावतीनं प्रयत्न करण्यात येणार असल्याची ग्वाही राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार (Minister Abdul Sattar) दिली.

Abdul Sattar : राज्यातील शेतकरी उत्पादक संस्था अधिक बळकट, सक्षम व्हावी यासाठी त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासनाच्यावतीनं प्रयत्न करण्यात येणार असल्याची ग्वाही राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार (Minister Abdul Sattar) दिली. बालेवाडी येथे आशियाई विकास बँक योजनेअंतर्गत राज्यातील शेतकरी उत्पादक संस्थेच्यासाठी आयोजित तंत्रज्ञान कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राज्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला पाहिजे, त्यांच्या शेतमालाला देश आणि विदेशात योग्य प्रकारे भाव मिळाला पाहिजे. नाशवंत मालाला मंदीच्या काळात साठवणूक करता यावी, शेतीमालाची आयात-निर्यात सुलभरित्या करता यावी, यासाठी शेतकरी हिताचे कायदे तयार करण्यात येत आहेत. विद्यमान नियमात काळानुरुप  बदलही करण्यात येत असल्याचे सत्तार म्हणाले. 

 कृषी व्यवसायाला चालना देण्यासाठी सर्व जिल्ह्यात मॅग्नेट प्रकल्प राबवणार

फलोत्पादन क्षेत्रातील कृषी व्यवसायाला चालना देण्यासाठी मॅग्नेट प्रकल्प फलोत्पादन क्षेत्रातील कृषी व्यवसायाला चालना देण्याकरीता 1 हजार 100 कोटी रुपयांचा महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प सर्व जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येत आहे. प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे, क्षमता विकास करणे, फलोत्पादन व फुल पिकांची गुणवत्ता तसेच उत्पादन वाढ करणे आणि साठवणूक करणे तसेच प्रक्रियेसाठी पायाभूत सुविधा उभारणी करणे या बाबीचा समावेश करण्यात आलेला आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांना 60 टक्क्यापर्यंत अनुदान देण्यात येत आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी होऊन या प्रकल्पाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सत्तार यांनी केले.

मॅग्नेट प्रकल्पात अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावी 

मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी उभी करतांना बिगर शेती, बांधकाम, वीज आदी बाबत अडी-अडचणी आल्यास मॅग्नेट प्रकल्पाच्या संचालक मंडळाशी चर्चा करावी. संचालक मंडळ आणि बँकेने समन्वय साधून, शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या अनुषंगाने सकारात्मक मार्ग काढून अधिकाधिक शेतकरी या प्रकल्पात सहभागी होईल, यादृष्टीने प्रयत्न करावे. प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर बैठकीचे आयोजन करण्यात येईल. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एखादी नवीन योजना आणता येईल, याबाबत विचार करावा. याकरीता निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही सत्तार यांनी दिली.

नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान अवगत असणे ही काळाची गरज

फलोत्पादन पिकांची स्थानिक बाजारपेठ, प्रक्रीया आणि निर्यातीसाठी असलेली संधी पाहता वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्था व मूल्यसाखळी गुंतवणूकदार यांना फलोत्पादन पिकांच्या सुधारित जाती, काढणीपश्चात व्यवस्थापन, पायाभूत सुविधांची उभारणी व बाजारपेठेबाबत माहिती आदीबाबत अद्ययावत माहीती व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान अवगत असणे ही काळाची गरज आहे.  यादृष्टीने विविध प्रशिक्षण आयोजित करून त्यांना मार्गदर्शन करावे. शेतकरी उत्पादक संस्थांची निवड करुन विदेशात त्यांचे अभ्यास दौरे आयोजित करावेत, राज्यातील शेतकरी सक्षम झाल्यास देशाची अर्थव्यवस्था मजबुत होण्यास मदत होईल, असेही  सत्तार म्हणाले.

कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल व्हावा 

राज्यातील विविध भागात वेगवेगळ्या प्रकारची पीके, फळे, कृषी मालाचे उत्पादन करण्यात येते. दोन दिवसीय कार्यशाळेत शेतकरी उत्पादक कंपन्यांनी नाविन्यपूर्ण माहितीचे आदान-प्रदान करावी. राज्याच्या विविध भागात शेतकरी उत्पादक कंपनी निर्माण झाली पाहिजे. अशा प्रकारच्या कार्यशाळा राज्यात विभागनिहाय आयोजित कराव्यात, या माध्यमातून मॅग्नेट प्रकल्पाविषयी अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यत माहिती पोहचवावी. यामुळे आगामी काळात कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल दिसून येईल, असा विश्वासही सत्तार यांनी व्यक्त केला. 

महत्त्वाच्या बातम्या:

संदिपान भुमरेंना 15 टक्के द्यावे लागते, सोसायटीच्या चेअरमनने अब्दुल सत्तारांसमोरच केली 'पोलखोल'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar On Yugendra Pawar : सख्ख्या पुतण्याला माझ्यासमोर उभं करायला नको होतं, अजितदादांचा शरद पवारांना टोलाBhaskar jadhav : भास्कर जाधव विधानसभा गटनेतेपदी, तर सुनील प्रभू प्रतोदपदी कायमNashik Farmer | केवळ सहा महिन्यांत शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यात महायुतीला यश, शेतकरी म्हणालेAbhijeet Patil on Madha : 30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात पाडली..अभिजीत पाटलांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Bhaskar Jadhav :  गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य
गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं...
Embed widget