एक्स्प्लोर

महावितरणच्या ऑफिसमध्येच शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

शहाजी यांच्या गावातील त्यांच्या घराला कालपासून कुलूप आहे. कारण घरातील कमावत्या व्यक्तीने असा प्रकार केल्याने घरातील सर्वच लोक घाबरुन गेले आहेत. दवाखान्यासमोर बसून नशिबाला दोष देत बसले आहेत.

लातूर : महावितरणच्या चुकीच्या वीज बिलामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने वेळोवेळी कार्यलयात अर्ज विनंत्या केल्या. मात्र तरीही सुधारणा होत नसल्याने हतबल शेतकऱ्याने कार्यालयातच विष पिऊन जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. शहाजी राठोड असे शेतकऱ्याचे नाव आहे. शहाजी राठोड हे एकंबीतांडा येथील रहिवासी आहेत. लातूरच्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. महावितरणने चुकीचे वीज बिल दिल्याने शहाजी यांनी अर्ज विनंती करुन वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली. मात्र त्यांनी कोणतीच कारवाई केली नाही आणि त्याउलट वीज बिलासाठी तगादा लावला. याचा जाब विचारण्यासाठी शाहाजी काल उजनीच्या कार्यलयात गेले. मात्र अधिकारी काहीच दखल घेत नसल्याचे लक्षात आले, त्यामुळे शहाजी संतप्त झाले. संतप्त आणि हतबल झालेल्या शाहाजी यांनी बाजूच्या दुकानातून रिगर नावाचे विषारी औषध आणले आणि महावितरणच्या कार्यलयातच प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. शहाजी राठोड यांच्यावर सध्या लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहाजी यांच्या गावातील त्यांच्या घराला कालपासून कुलूप आहे. कारण घरातील कमावत्या व्यक्तीने असा प्रकार केल्याने घरातील सर्वच लोक घाबरुन गेले आहेत. दवाखान्यासमोर बसून नशिबाला दोष देत बसले आहेत. शाहाजी यांच्याकडे वडिलोपार्जित अडीच एकर जमीन आहे. दोन भावांमध्ये ही जमीन आहे. आर्थिक सुधारणा व्हावी यासाठी त्यांनी गावातच पिठाची गिरणी सुरु केली. मात्र त्याही ठिकाणी वीज वितरणने धोका दिला. गावात सिंगल फेज सुरु केली. गिरणी बंद पडली, त्यांचे लाईट बिल थकले. अशातच त्यांच्या शेतातील कृषी पंपाचे वीज बिल अचानकपणे 59 हजार रुपयांचे आले. याबाबत शहाजी यांनी पाठपुरावा केला. मात्र दखल घेतली गेली नाही. ते सारखे वीज वितरणाच्या कार्यालयात जात होते. त्यातच गावातील डीपी नादुरुस्त झाला आहे. गावात पाणीपुरवठा बंद झाला आहे. एकाच गावात विजेमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने हतबल आणि संतप्त झालेले शाहाजी काल कार्यालयात गेले, असे ग्रामस्थ सांगत आहेत. याबाबत वीज वितरण अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी बोलण्यास टाळाटाळ केली. शहाजी यांचा एकही अर्ज आला नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. मात्र केलेल्या अर्जाची एक प्रत तर शहाजी यांच्याकडे आहे. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांची मुजोरी आणि वसुलीचा तगादा लक्षात येतो आहे. हे सर्व शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Goverment Cabinet Decision: सिंचन, चिपी विमानतळ, शेत-पाणंद रस्ते; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 12 धडाकेबाज निर्णय
सिंचन, चिपी विमानतळ, शेत-पाणंद रस्ते; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 12 धडाकेबाज निर्णय
दुष्काळाने शेती करपली, रोजगारही हिरावला; कर्जाच्या ओझ्याने हतबल झाला अन् 29 वर्षीय तरुणाने जीव संपवला, चिठ्ठीत कर्जवसुलीच्या तगाद्याचा उल्लेख
दुष्काळाने शेती करपली, रोजगारही हिरावला; कर्जाच्या ओझ्याने हतबल झाला अन् 29 वर्षीय तरुणाने जीव संपवला, चिठ्ठीत कर्जवसुलीच्या तगाद्याचा उल्लेख
कुणीही असो वक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
कुणीही असो वक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
Maharashtra Vidhan Parishad Result 2026: नागपूर पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेस अन् भाजपमध्ये नेट टू नेट फाईट; कराळे मास्तर गेमचेंजर ठरणार?
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Live: नागपूर पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेस अन् भाजपमध्ये नेट टू नेट फाईट; कराळे मास्तर गेमचेंजर ठरणार?

व्हिडीओ

Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pradeep Purnekar Death Case: बसलेल्या उठल्या, पोलिसांसमोर उभ्या राहिल्या; प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा पोलीस स्थानकांत रौद्रावतार, राजन विचारेही बघत राहिले, नेमकं काय घडलं?
बसलेल्या उठल्या, पोलिसांसमोर उभ्या राहिल्या; प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा पोलीस स्थानकांत रौद्रावतार, राजन विचारेही बघत राहिले, नेमकं काय घडलं?
कुणीही असो वक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
कुणीही असो वक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
Pune Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : पुण्यातील मतमोजणीवर केंद्रावर मविआ अन् महायुतीचे कार्यकर्ते भिडले; जेवण आत आणण्यावरून गोंधळ, कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, जेवणाचे बॉक्स घेताना राडा, नेमकं काय घडलं?
पुण्यातील मतमोजणीवर केंद्रावर मविआ अन् महायुतीचे कार्यकर्ते भिडले; जेवण आत आणण्यावरून गोंधळ, कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, जेवणाचे बॉक्स घेताना राडा, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती; सरकारकडून चौथी यादी जाहीर
Farmers Loan Waiver: मोठी बातमी! दिवाळीपूर्वी 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती; सरकारकडून चौथी यादी जाहीर
Pune Metro Line 3 : अखेर मुहूर्त ठरला; पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'या' तारखेला होणार हिंजवडी मेट्रोचे उद्घाटन, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
अखेर मुहूर्त ठरला; पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'या' तारखेला होणार हिंजवडी मेट्रोचे उद्घाटन, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
Pune Police Security: पुणे पोलीस आयुक्तालयाचा मोठा निर्णय; विद्यानंद बापटांसह 'या' व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढलं, तर फरार राणा सूर्यवंशी अन् लक्ष्मण हाकेंचं संरक्षण 'जैसे थे'
पुणे पोलीस आयुक्तालयाचा मोठा निर्णय; विद्यानंद बापटांसह 'या' व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढलं, तर फरार राणा सूर्यवंशी अन् लक्ष्मण हाकेंचं संरक्षण 'जैसे थे'
मन हेलावणारी घटना; न्यायालयाच्या कामानिमित्त शहरात गेले, भीषण अपघातात दोन चुलत भावांचा मृत्यू
मन हेलावणारी घटना; न्यायालयाच्या कामानिमित्त शहरात गेले, भीषण अपघातात दोन चुलत भावांचा मृत्यू
Sanjay Raut: उज्ज्वल निकमांनी केलं टोरेंट पॉवर प्रकल्पाचं समर्थन ; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, '10 झाडं म्हणजे एक कसाब, अब्रुची लक्तरे...'
उज्ज्वल निकमांनी केलं टोरेंट पॉवर प्रकल्पाचं समर्थन ; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, '10 झाडं म्हणजे एक कसाब, अब्रुची लक्तरे...'
Embed widget