धक्कादायक! कोरोनाच्या भीतीमुळे बाळासह गावी आलेल्या महिलेला कुटुंबाने प्रवेश नाकारला
कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे सहा महिन्यांच्या बाळासह गावी आलेल्या महिलेला तिच्याच कुटुंबाने प्रवेश नाकारल्याची धक्कादायक घटना सावंतवाडी तालुक्यातील सांगोली गावात घडली. या महिलेचे पती सैन्यात आहेत.
सिंधुदुर्ग : कोरोना व्हायरसपासून दूर राहण्यासाठी अनेकांनी गावाची वाट धरली आहे. मात्र, ग्रामस्थांनीही आपल्या गावच्या वाटा शहरवासीयांसाठी बंद केल्याच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक असंवेदनशील घटना सावंतवाडी तालुक्यातील सांगोली गावात घडली. पण, इथं गावाने नाही तर स्वतःच्या कुटुंबानेच एका महिलेसह तिच्या सहा महिन्याच्या बाळाला घरात प्रवेश नाकारला. कुटुंबीयांनी घरात घेतले नसल्याने तिला ओरोस येथे जिल्हा रुग्णालयात क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. या महिलेचा पती सैन्यात असल्याने नवी मुंबईहून पोलिसांची परवानगी घेऊन ती महिला आपल्या बाळासह गावी आली होती.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गावात नवी मुंबईतून तीन महिन्यांच्या बाळासह एक महिला गावात आली. पण घरच्यांनीच प्रवेश नाकारल्याने तिला जिल्हा रुग्णालयात क्वॉरंटाईन व्हावे लागले. तिचा पती सैन्यदलात कार्यरत आहे. पती सैन्यात असल्याने घरात कोरोनामुळे घाबरून गेलेल्या महिलेने नवी मुंबईहून तीन महिन्याच्या बाळासह गावी जाण्याचा निर्णय घेतला. पोलिसांची परवानगी घेऊन आपल्या सांगेली गावात आली. पती सैनिक असल्याने तिला सांगेली गावात सोडण्यासाठी पोलीस आले होते. कुटुंबीयांनी घरात घेतले नसल्याने तिला ओरोस येथे जिल्हा रुग्णालयात क्वॉरंटाईन करण्यात आले. पती नसल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीती वाटू लागली म्हणून तिने आपले गावातील घर गाठले. पण घरातील मंडळींनी तिला प्रवेश देण्यास नाकारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही महिला सांगेली गावात घरी आली, पण तिच्या कुटुंबीयांनी तिला घरात घेतले नाही. तीन महिन्यांच्या बाळाला दूध तापवून देण्याचे देखील नाकारले.
नवरा-बायकोचं भांडण झाल्यास नवऱ्याला इन्स्टिट्यूशनल क्वॉरन्टाईन करणार : पुणे झेडपी
लोकांची संवेदनशीलता कमी होतेय शहारापेक्षा अजूनही गावाकडे संवेदनशीलता आणि माणुसकी असल्याची उदाहरणे आपण नेहमी पाहतो. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे सर्वच नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी लोक असंवेदनशीलपणे वागताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच एका कुटुंबातील व्यक्तीला कोरोना झाल्याची बातमी समोर येताच संपूर्ण कुटुंबालाच वाळीत टाकण्याचा प्रकार समोर आला होता. अशा घटना ताज्या असताना अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये लोकांचा असंवेदनशीलपणा समोर आला. कांदे विकायला नेणारा ट्रक पंक्चर झाल्याची संधी साधत लोकांनी शेतकऱ्याचे कांदे लुटल्याचा प्रकार समोर आला. आधीच शेतकरी संकटात आहे. लोकांच्या अशा वागण्याने तो अधिक संकटात लोटला जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
Labor In Shahapur | गावाकडं पायी निघालेल्या परप्रांतिय मजुरांना पोलिसांनी शहापुरात रोखलं