एक्स्प्लोर
Advertisement
आता विद्यार्थी बारावीत 'फेल' होणार नाही, गुणपत्रिकेवर 'असा' येणार शेरा
परिक्षेतील यशापयशावर विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक भवितव्याची दिशा ठरत असते. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षेस बसणारा विद्यार्थी अनुतीर्ण झाल्यास विद्यार्यांच्या मानसिक आणि शारिरिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो. या संदर्भात महाराष्ट्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : बारावी ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची परीक्षा मानली जाते. काही विद्यार्थ्यांना या परीक्षेचं खूप टेन्शन देखील असतं. आता बारावीच्या परिक्षेत अयशस्वी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर अनुत्तीर्ण हा शब्द वापरण्यात येणार नाही. याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आला आहे. परिक्षेतल्या यशापयशाचा विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम होतो. त्यामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे. अनुत्तीर्ण या शब्दाऐवजी आता 'एलिजिबल फॉर ओन्ली स्कील डेव्हलपमेंट प्रोग्राम' असा शेरा विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर असणार आहे.
इयत्ता 12 वीच्या जुलै /ऑगस्ट 2020 च्या पुरवणी परीक्षेपासून गुणपत्रिकेमध्ये हा बदल केला जाणार आहे, असे शासन निर्णयात म्हटलं आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मडळामार्फत घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. या परिक्षेतील यशापयशावर विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक भवितव्याची दिशा ठरत असते. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षेस बसणारा विद्यार्थी अनुतीर्ण झाल्यास विद्यार्यांच्या मानसिक आणि शारिरिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो.
दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर अनुत्तीर्ण (Fail) हा शब्द न यापरता विद्यार्थी पुरवणी परिक्षेत श्रेणी विषयासह तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयात अनुतीर्ण असल्यास 'एलिजिबल फॉर ओन्ली स्कील डेव्हलपमेंट प्रोग्राम' असा शेरा देण्यात येतो. त्याच धर्तीवर कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांच्याकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार 12 वी च्या विद्यार्थ्याच्या गुणपत्रिकेवर सुधारित शेरे नमूद करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12 वी परीक्षेच्या जुलै/ऑगस्ट 2020 च्या पुरवणी परीक्षेपासून आणि सन 2020 पासून घेण्यात येणाऱ्या नियमित परीक्षेला (फेबुवारी/मार्च) प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत अनुत्तीर्ण (Fail) हा शब्द यापुढे वापरण्यात येणार नाही. त्या ऐवजी ( Eligible for only skill development program) असा शेरा असणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement