एक्स्प्लोर

Exclusive : मंत्र्यांचे बंगले, उधळपट्टीचे इमले! मंत्र्यांच्या बंगल्यांसह कार्यालयावर पुन्हा कोट्यवधींचा खर्च, ABP Majha कडून पर्दाफाश 

अवघ्या काही महिन्यांपूर्वी नूतनीकरण झालेल्या मंत्र्यांच्या बंगले (Ministers bungalows) आणि कार्यालयावर पुन्हा कोट्यवधींची उधळपट्ट करण्यात आली आहे.

Expenditure on the offices and Ministers bungalows:  अवघ्या काही महिन्यांपूर्वी नूतनीकरण झालेल्या मंत्र्यांच्या बंगले (Ministers bungalows) आणि कार्यालयावर पुन्हा कोट्यवधींची उधळपट्ट करण्यात आली आहे. रंगरंगोटीसाठी कागदोपत्री निविदा काढण्यात आली आहे. याबबात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उधळपट्टीचा एबीपी माझाकडून (Abp Majha) पर्दाफाश करण्यात आला आहे. 

मार्च महिन्यातच मंत्र्यांचे बंगले आणि कार्यलये यांचे नूतनीकरण केलं होते. यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा त्यांच्या रंगरंगोटीसाठी कोट्यवधींचे टेंडर काढले जात आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये 30 कोटींचं काम करण्यात आलं होतं. त्यात गैरव्यवहाराचा आरोप झाला होता. त्याची अजून चौकशी सुरू असतानाच पुन्हा एकदा कागदोपत्री कामं दाखवून कोट्यवधी रुपयांच्या निविदा काढल्या जात असल्याचे उघड झालं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातला हा अनागोंदी कारभार एबीपी माझानं चव्हाट्यावर आणला आहे. 

'या' नेत्यांच्या बंगल्यांचे कार्यलयांचे नूतनीकरण

मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर असलेलं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच कार्यालय आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर कार्यालयातील मंत्री दालन, सभागृह, कार्यालय, बैठक व्यवस्था यांचं नूतनीकरण करण्यासाठी 22 लाख 33 हजार रुपयाचं टेंडर काढण्यात आलं आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आलिशान देवगिरी निवासस्थानावर काही दिवसांपूर्वीच लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला होता. मात्र आता पुन्हा एकदा इथली वॉर रुम, ऑफिस बिल्डिंग आणि व्हीआयपी गेस्ट रुमच्या दुरुस्ती आणि बांधकामासाठी तब्बल 83 लाख 16 हजार रुपयांचं नवीन टेंडर काढण्यात आलं आहे. एवढंच नव्हे तर अजित पवारांच्या अधिकाऱ्यांसाठी मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर कार्यालय आहे. त्यांच्या आसन व्यवस्थेचं नूतनीकरण करण्यासाठी पुन्हा एकदा 15 लाख 29 हजार रुपयांचं टेंडर काढण्यात आलं आहे. विस्तारित मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच चकचकीत कार्यालय आहे. या कार्यालयातील मंत्री महोदयांचे चेंबर, अँटी चेंबर , सभागृह आणि कार्यालयाच नूतनीकरण आणि बैठक व्यवस्था याची डागडूजी करण्यासाठी पुन्हा एकदा 36 लाख 69 हजार रुपयांच नव्याने टेंडर काढण्यात आलं आहे. 

दोनच वर्षांपूर्वी नव्यानं बनवलेल्या कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्याचं प्लास्टर आणि रंगकाम करण्यासाठीसु्द्धा 20 लाखांचं टेंडर पुन्हा काढण्यात आलं आहे. आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या चित्रकूट बंगल्याचं प्लास्टर आणि रंगकाम करण्यासाठी पुन्हा 20 लाख रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षीच त्यावर 45 लाखांचा खर्च करण्यात आला होता. सांस्कृतिक कार्यमंत्री मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या पर्णकुटी बंगल्याच्या प्लास्टर आणि रंगकामासाठी ही पुन्हा एकदा 20 लाखांची निविदा काढण्यात आलीय. विशेष म्हणजे या बंगल्याचं काम पूर्णपणे नव्यानं करण्यात आलेलं होतं. 

पुन्हा टेंडर काढण्यासाठी बांधकाम विभागानं लढवली नवी शक्कल 

सगळ्याच मंत्र्यांनी आपल्या कार्यालयाची कामं आधीच केलेली आहेत. त्यामुळे पुन्हा टेंडर काढण्यासाठी बांधकाम विभागानं नवी शक्कल लढवली आहे. मंत्रालयातील विस्तारित इमारतीच्या 1 ते 3 मजल्यावरच्या मंत्र्यांचे दालनं आणि विविध कार्यालयांच पॉलिश आणि रंगकाम करण्यासाठी 33 लाख 72 हजार रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. मंत्रालयाच्या मुख्य इमारतीमधील 1 ते 6 मजल्यावरील मंत्र्यांची दालनं आणि वेगवेगळ्या कार्यालयांच्या पॉलिश आणि रंगकामासाठी 33 लाख 71 हजार रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत.  पण कोणत्या ठिकाणी काम करणार याचा मात्र उल्लेख नसल्यानं या निविदा संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. 

मंत्र्यांचा राबता सध्या कार्यालयात कमी आणि आपापल्या मतदारसंघात जास्त

मंत्र्यांचा राबता सध्या कार्यालयात कमी आणि आपापल्या मतदारसंघात जास्त आहे. कारण विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. येत्या काही महिन्यांत नवीन सरकार अस्तित्वात येणार आहे. तरीही बंगल्यांच्या नूतनीकरणासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोट्यवधींचा चुराडा कशासाठी? हा प्रश्न आहे. जनतेच्या पैशांवर मंत्र्यांच्या बंगल्यांना नवा साज चढवण्याचा हा हट्ट म्हणजे सरकारी तिजोरीवर मारलेला डल्लाच असल्याचे बोलले जात आहे. 

जी.जे भोसले मार्गावरच्या सुनीती इमारतीच्या सातव्या मजल्यावरच्या सदनिका क्रमांक 13 चं नूतनीकरण आणि पुरवठा  यासाठी 25 लाख 8 हजार रुपयांची निवीदा काढण्यात आली आहे. तसेच मादाम कामा रोडवरच्या नव्या प्रशासकीय इमारतीवरच्या 15 व्या मजल्यावरील पर्यावरण विभागातलं कूलरचं नूतनीकरण आणि फर्निचरचं कामासाठी 15 लाख 33 हजार, मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय परिसर इथं सिमेंट काँक्रिट रोड तयार करणं यासाठी 70  लाख 79 हजार रुपये. नवीन विधानभवन येथील मंत्री चेंबर, अधिकारी कार्यालय, कमिटी रुम इथं दुरुस्तीच्या कामासाठी 16 लाख 83 हजार रुपये, जुने जकात घर मुंबई इमारतीच्या 1 आणि 2 मजल्यावरचे दरवाजे, खिडक्या, फ्लोरिंची दुरुस्ती यासाठी 8 लाख 79 हजार रुपये, कफ परेड इथली गीता नगर लँडिंग पॉईंट कोस्टल पोलीस चौकी दुरूस्तीची कामासाठी 36 लाख 95 हजार रुपये, मंत्रालय मुख्य इमारतीच्या रुम नंबर 301 आणि मंत्र्यांचं चेंबर, अँटीचेंबर, सभागृह दुरुस्ती यासाठी 27 लाख 19  हजार रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. 

महत्वाच्या बातम्या:

NCP Ministers: कॅबिनेट मंत्र्यांना राज्यमंत्र्यांचे बंगले; निवासस्थानाच्या वाटपावरून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune : पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
Mhada lottery 2024 प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ICC Women's T20 World : Tejaswini Pandit Ek Number Movie  : तेजस्विनी पंडितची निर्मिती असलेला 'येक नंबर' सिनेमाABP Majha Headlines : 11.00 PM : 13 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra News:विदर्भात महायुतीतले वाद चव्हाट्यावर, धनंजय मुंडे,वळसे पाटलांवर आशिष देशमुखांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune : पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
Mhada lottery 2024 प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
''आनंदाच्या शिधामधील डाळ निकृष्ट, साखरही पिवळसर;पाकिटातील तेलातही मारलाय काटा''
''आनंदाच्या शिधामधील डाळ निकृष्ट, साखरही पिवळसर;पाकिटातील तेलातही मारलाय काटा''
गणपती बाप्पांचे विसर्जन करताना दोघे बुडाले; पोलिसांची समुद्रात धाव, सुदैवाने दोघांचा जीव वाचला
गणपती बाप्पांचे विसर्जन करताना दोघे बुडाले; पोलिसांची समुद्रात धाव, सुदैवाने दोघांचा जीव वाचला
Amol Mitkari: 'ही' तर बालिश नेत्याच्या डोक्यातील घाण; अमोल मिटकरींचा रोहित पवारांवर बोचरा आरोप
'ही' तर बालिश नेत्याच्या डोक्यातील घाण; अमोल मिटकरींचा रोहित पवारांवर बोचरा आरोप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
Embed widget