एक्स्प्लोर
नागपूरवर पाणीटंचाईसोबत लोडशेडिंगचं संकट
नागपूर जिल्ह्यात दररोज 12 तास वीजपुरवठा होणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
नागपूर : पावसानं दडी मारल्यामुळं नागपूरला पाणीटंचाई बरोबर आता लोडशेडिंगचाही सामना करावा लागणार आहे. पुढच्या आठवड्यापासून नागपूर जिल्हयात दररोज फक्त 12 तास वीजपुरवठा केला जाईल, अशी माहिती उर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलीय.
नागपूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पाणी पुरवठ्याचा आढावा घेतल्यानंतर 12 तास लोडशेडिंगचा निर्णय घेण्यात आलाय. 12 तास लोडशेडिंगच्या निर्णयाचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
जिल्ह्यात यंदाच्या मोसमात आतापर्यंत 500 मिलीमीटर पावसाची नोंद झालीय. त्यामुळं पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनत चाललाय. कमी पावसामुळं अनेक ठिकाणी दुबार पेरणी करावी लागली. धान पिकाच्या रोवण्या मात्र अद्यापही झालेल्या नाहीत.
दुसरीकडे पावसानं दडी मारल्यानं अनेक धरणातील पाणीपातळी कमालीची खालावली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होत आहे. जिल्ह्यातील तोतलाडोह धरण कोरडं होणार आहे. परिणामी शेतकऱ्यांची स्थिती आणखीच गंभीर झाली आहे.
यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement