(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eknath Shinde : शिवसेनेनं जारी केलेला व्हीप लागू होत नाही : एकनाथ शिंदे
Eknath Shinde : शिंदे गटातील आमदारांना आणि ठाकरे गटातील आमदारांनाही... तर दुसरीकडे शिवसेनेनं जारी केलेला व्हीप लागू होत नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
Eknath Shinde : भाजप आणि महाविकास आघाडीनं उमेदवार जाहीर केले पण यात खरा ट्विस्ट अद्याप बाकी आहे तो म्हणजे महाविकास आघाडीकडून जाहीर झालेले उमेदवार म्हणजेच राजन साळवी हे शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार आहेत. शिवसेनेकडून आमदारांना व्हिप जारी केलाय आणि हा व्हिप विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना लागू राहणार आहे. शिंदे गटातील आमदारांना आणि ठाकरे गटातील आमदारांनाही... तर दुसरीकडे शिवसेनेनं जारी केलेला व्हीप लागू होत नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
शिवसेनेतले सर्व बंडखोर आमदार आज 11 दिवसानंतर मुंबईत परतले. आमदारांना आणण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोव्याला गेले होते. मुंबईत 8 वाजता आमदारांना गोव्याहून एक स्पेशल विमान मुंबई विमानतळावर घेऊन आलं. त्यावेळी त्यांनी एका वाक्यात ही प्रतिक्रिया दिली. विमानतळावरील बसमधून आमदारांना ताज प्रेसिडन्ट हॉटेलमध्ये आणण्यात आलं. यावेळी 50 आमदारांसाठी विमानतळ ते ताज प्रेसिडन्ट हॉटेल हा 30 किमीचा रस्ता पूर्ण मोकळा करण्यात आला होता. मोठ्या संख्येनं पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर होता. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना रस्त्यावर उतरु नये असं आवाहन केल्यानं एकही शिवसैनिक रस्त्यावर उतरला नव्हता. एकाही शिवसैनिकानं आमदारांच्या मार्गात येऊ नये अशी सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या होत्या. त्यानुसार रस्त्यावर शिवसैनिक पाहायला मिळाला नाही. पोलिसांच्या कडक सुरक्षेत आमदारांना हॉटेल ताजवर आणण्यात आलं.
आगामी काळात अध्यक्ष महोदय असं कुणाला संबोधलं जाणार याचा निर्णय उद्या होणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांनी अर्ज भरलाय. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा तास उरला असताना राजन साळवी यांनी अर्ज भरला. आता उद्या होणाऱ्या निवडणुकीत कुणाची सरशी होणार हे स्पष्ट होईल.
संबंधित बातम्या :
शिवसेना एक.... व्हिप दोन, विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी शिवसेना आमदारांना व्हीप जारी