Eknath Shinde : शिंदे गट आठवडाभर गुवाहाटीत, जेवणाचं बिल 22 लाखांचं, एकूण खर्च किती?
Eknath Shinde : एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांना घेऊन सूरतमार्गे गुवाहाटीमध्ये मुक्कामी होते. या आठ दिवसांत लाखो रुपयांचा खर्च झालाय.
Eknath Shinde : एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांना घेऊन सूरतमार्गे गुवाहाटीमध्ये मुक्कामी होते. गुवाहाटीमधील रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये शिंदे गट आठ दिवस मुक्कामी होता. या आठ दिवसांत लाखो रुपयांचा खर्च झालाय. फक्त जेवणाचं बिल 22 लाख रुपयांचं असल्याचं वृत्त आहे. गुवाहाटीतील रॅडिसन ब्ल्यूमध्ये आठ दिवस एकनाथ शिंदे गट होता. यामध्ये तब्बल 70 लाखांच्या आसपास खर्च झाल्याचं सांगण्यात येतेय. दरम्यान, 15 दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघाले होते. शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांनी मुंबई सोडल्यानंतर पहिला मुक्काम सूरतमध्ये केला. त्यानंतर ते गुवाहाटीला गेले. महाराष्ट्रात येण्यासाठी नंतर ते गोव्यात आले आहेत.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांना हाताशी धरत त्यांनी सत्तास्थापनेचा दावा केला. त्यांच्यासोबत शिवसेनेच्या आमदारांसह अपक्ष अशा जवळपास 50 जणांचा पाठिंबा आहे. हे सर्व आमदार सध्या गोव्यातील हॉटेलमध्ये आहेत. बहुमत चाचणीला सर्व आमदार मुंबईत परत येतील. पण या आमदारांचा गुवाहाटीमधील खर्च तब्बल 70 लाखांच्या आसपास आहे. फक्त जेवणाचं बिल 22 लाख रुपयांचं असल्याचं वृत्त आहे.
प्रसार माध्यमांनी हॉटेल व्यवस्थापनाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, रॅडिसन ब्ल्यूचं आठ दिवसाचे बिल एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांनी भरलेय. त्यांचा एकूण खर्च हॉटेल व्यवस्थापनानं सांगितला नाही. पण सुत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, त्यांनी 68 ते 70 लाख रुपयांची रक्कम भाडे म्हणून हॉटेलला चुकती केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटासाठी रॅडिसन ब्ल्यूमध्ये तब्बल 70 खोल्या बूक करण्यात आल्या होत्या. बंडखोर आमदारांमुळे हॉटेल व्यवस्थापनाने 22 ते 29 जून यादरम्यान अन्य ग्राहकांसाठी रेस्रॉ, बँक्वेट आणि इतर सुविधा बंद केल्या होत्या. एकनाथ शिंदे गटातील आमदारांचा रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमधील मुक्काम सुपीरियर आणि डिलक्स रुममध्ये होता. हॉटेलच्या वेबसाईटनुसार, एक खोलीचं भाडे 7500 ते 8500 रुपये प्रति दिवस इतके होते. सवलत आणि टॅक्स धरून 70 खोल्यांचं भाडं जवळपास 68 लाख रुपयांच्या घरात जातं. त्याशिवाय आठ दिवसांतील जेवणाचा खर्च तब्बल 22 लाख रुपये इतका आल्याचे वृत्त आहे.