Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे समर्थकांचा गुवाहाटीमधील मुक्काम वाढला, हॉटेलचं बुकिंग वाढवलं
Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह बंडखोर आमदारांचा आसाममधील गुवाहाटीच्या रेडिसन ब्लू हॉटेलमधील मुक्काम आणखी वाढला आहे.
Maharashtra Political Crisis : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्यासोबत बंडखोरी केलेल्या आमदारांचा गुवाहाटीमधील मुक्काम वाढला आहे. हॉटेल रेडिसन मधील बंडखोर आमदारांच्या खोल्यांचे बुकिंग 30 तारखेपर्यंत वाढवण्यात आले आहे. कायदेशीर लढाई, उपाध्यक्ष यांच्यावर अविश्वास ठराव, भाजप सोबत चर्चा याला वेळ लागणार असल्यामुळे बंडखोर आमदार अजून 30 जून पर्यंत तरी गुवाहाटी येथेच थांबणार आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलय. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैटकींचा सपाटा लावलाय. तर एकनाथ शिंदे यांच्याकडून देखील जोरदार हालचाली सुरू आहेत. शिंदे गटाच्या अनेक गुप्त बैठका होत आहेत. याबरोबरच शिवसेनेचे बंडखोर नेते दीपक केसरकर यांनी शनिवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही राज्यात या क्षणी येणं योग्य नसल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे आता बंडखोर आमदार आणखी काही दिवस गुवाहाटीतच मुक्कामी असणार आहेत.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात विविध घडामोडी घडत आहेत. बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राज्यातील विविध ठिकाणी आमदारांच्या कार्यालयांवर शिवसैनिकांनी हल्ला करत तोडफोड केली आहे. तर काही ठिकाणी बंडखोर आमदारांच्या फोटोंना काळे फासण्यात आले आहे. त्यामुळे या सर्व राजकीय घडामोडींमुळे राज्यातील वातावरण चांगलचं तापलयं. याच पार्श्वभूमिवर सध्या मुंबईत येण योग्य नसल्याचं दीपक केसरकर यांनी म्हटलंय.
गुवाहाटीलमधील हॉटेलचं बुकिंग आधी 28 जूनपर्यंत होतं. त्यात आता आणखी दोन दिवसांची वाढ करून 30 जुनपर्यंत बुकिंग करण्यात आले आहे. या हॉटेलचा दिवसाचा आठ लाख रूपये खर्च असल्याचे सांगण्यात येतंय. बुकिंग वाढल्यामुळे या खर्चात आणखी वाढ होणार आहे.
महत्वाच्या बातम्या