एक्स्प्लोर

आजही सांगतो, पुरावे द्या, राजीनाम्यानंतर खडसेंनी ठणकावलं

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून होत असलेल्या बेछूट आरोपांवर कुठलेही पुरावे न देता भाजप सरकारची बदनामी सुरु आहे. त्यामुळंच सगळ्या प्रकरणांची सखोल चौकशी करावी अशी मागणी करत आपण मुख्यमंत्र्यांना राजीनामा सुपूर्द करणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितलं. तसंच मी आजही सांगतो, माझ्याविरोधात एकही पुरावा द्या, मंत्रिपद नव्हे तर राजकारण सोडेन, असं आव्हान खडसेंनी दिलं.   थोड्याच वेळापूर्वी एकनाथ खडसेंनी भाजपच्या प्रदेश कार्यालयात रावसाहेब दानवे आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली.   अशी मीडिया ट्रायल अनुभवली नाही गजानन पाटीलनं खडसेंसाठी 30 कोटी लाच मागितल्याचा आरोप असो किंवा मग भोसरी एमआयडीसीतलं प्रकरण किंवा मग लिमोझिनच्या मॉडिफिकेशनचा वाद या सगळ्या प्रकरणात आरोप करणाऱ्यांनी कुठलेही पुरावे दिले नाहीत. मात्र त्यानंतरही मीडिया ट्रायल सुरु असल्यानं आपण व्यथित झाल्याचंही खडसे म्हणाले.   सर्व आरोपांची चौकशी करा "माझ्यावरील सर्व आरोप हे तथ्यहीन, बिनबुडाचे आणि बदनाम करणारे आहेत. मी  आरोप करणाऱ्या प्रत्येकाला पुरावे देण्याचं आव्हान दिलं आहे. मात्र कुणी एकानेही पुरावे दिले नाहीत. मात्र सततच्या आरोपामुळे पक्षाची बदनामी होत आहे. त्यामुळे माझ्यावरील आरोपांची संपूर्ण चौकशी होईपर्यंत मी पदावर न राहण्याचा निर्णय घेतला आहे", असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं.   हॅकर्स म्हणजे चोर दाऊद कॉलप्रकरणी बोलताना खडसे म्हणाले, "हॅकर म्हणजे चोर. तुम्ही एखाद्या चोरावर कसा विश्वास ठेवता? दाऊदशी कॉल करण्याचा संबंधच नाही. हॅकरने एकतरी पुरावा सादर करावा. याप्रकरणाची चौकशी करा अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. जर माझ्याविरोधात काही तथ्य आढळलं नाही, तर हॅकरसह त्यांच्यासोबत जे जे असतील त्यांच्यावर कारवाई करावी"   भोसरी जमीन खरेदी नियमानुसारच दुसरीकडे ज्या जमीन प्रकरणावरून खडसेंवर राजीनाम्याची वेळ ओढावली, ती भोसरीतील जमीन खरेदी नियमानुसारच असल्याचा दावा खडसेंनी केला. मात्र ही अवैध ठरवण्याचा प्रयत्न होत आहे. पण या प्रकरणातही कुणीही एकही पुरावा दिलेला नाही, असंही खडसेंनी सांगितलं.   लिमोझिनी कारबाबत स्पष्टीकरण ज्या कारवरून अंजनी दमानिया यांनी आरोप केले, त्याबाबतही खडसेंनी स्पष्टीकरण दिलं. ज्या कारबद्दल वाद चालू आहे, त्या कारची मूळ मालकाकडून खरेदी 2008 मध्ये केली होती, त्यानंतर ती प्रांजल खेवलकर यांनी 2012 मध्ये खरेदी केली. मात्र माझ्या मुलीचं लग्न 2013 मध्ये झालं, त्यामुळे कार खरेदी प्रकरण  वादाचं कसं? तसंच त्याबाबतही दमानियांनी पुरावे द्यावे, असं आव्हान खडसेंनी दिलं. खडसेंच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे   खडसेंवरील आरोपात काहीही तथ्य नाही - रावसाहेब दानवे   भाजप खडसेंच्या मागे भक्कमपणे उभा, पक्ष वाढवण्यात त्यांची मोलाची भूमिका - रावसाहेब दानवे   40 वर्षांच्या काळात अनेक चढ-उतार पाहिले - खडसे   40 वर्षांच्या काळात अनेक चढ-उतार पाहिले - खडसे माझ्याविरोधात आजपर्यंत कुणी एकानेही लेखी पुरावा दिला नाही - खडसे गाडीची खरेदी 2012 मध्ये, मुलीचं लग्न 2013 मध्ये, जावयाच्या गाडीवर खडसेंचं स्पष्टीकऱण   40 वर्षात पहिल्यांदाच मीडिया ट्रायल अनुभवली : खडसे   LIVETV-  माझ्यावरील सर्व आरोपांची चौकशी व्हावी, अशी मुख्यमंत्र्यांना विनंती केली : खडसे LIVETV-  फेसबुकपेजवर माझी संपूर्ण कागदपत्र आहेत, सर्वांसाठी खुली आहेत : खडसे   मी अत्यावश्यक असे 119 निर्णय घेतले, शेतकऱ्यांसाठी शक्य ते केलं : खडसे दाऊद कॉलप्रकरणाची चौकशी करा, हॅकरकडे पुरावे नसतील तर त्याच्यावर कारवाई करा: खडसे   हॅकर म्हणजे चोर, तुम्ही चोरावर कसा विश्वास ठेवता? : खडसे   मी दररोज सांगतोय, माझ्याविरोधातील आरोपांचे पुरावे द्या : खडसे
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget