गिरीश महाजनांच्या वक्तव्याचा भाजपच्या खासदार रक्षा खडसेंना मोठा धक्का! एकनाथ खडसे म्हणाले, पातळी घसरली...
Eknath Khadse On Girish Mahajan : एकनाथ खडसे यांच्या मुलाचा खून झाला होता की आत्महत्या असं खळबळजनक वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केंल आहे. महाजन यांच्या या वक्तव्यावर खडसे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
जळगाव : मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी जे वक्तव्य केंल आहे, ते वक्तव्य म्हणजे रक्षा खडसे यांच्यावर तसेच माझ्या कुटुंबावर संशय व्यक्त करणारं आहे. या वक्तव्यामुळे माझ्या परिवाराला अंत्यंत वेदना झाल्या आहेत आणि अंत्यंत दु:ख झालंय. पत्नी मंदा खडसे, सून रक्षा खडसे , आणि कुटुंबिय तसेच नातेवाईक यांना या वक्तव्यांमुळे मोठा धक्का बसला असून आम्हा सर्वांच्या भावना दुखावल्या आहेत, असे मत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी व्यक्त केले आहे. राजकीय द्वेषातून माणूस किती खाली जावू शकतं याच हे उदाहरण म्हणजे महाजन यांच वक्तव्य आहे. हा सत्तेचा माज आणि मस्ती असून जनता हा माज खाली उतरविल्याशिवाय राहणार नाही, असा निशाणा देखील एकनाथ खडसे यांनी यावेळी गिरीश महाजन यांच्यावर साधला आहे.
एकनाथ खडसे यांच्या मुलाचा खून झाला होता की आत्महत्या असं खळबळजनक वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केंल आहे. महाजन यांच्या या वक्तव्यावर खडसे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. "गेल्या चाळीस वर्षापासून मी राजकारणात आहे, मात्र एवढ्या घाणेरड्या स्तरावरच राजकारण केलं नाही. विषारी टीका करायचो, पण विचार करुन करायचो, एखादा शब्द चुकीचा बोलला गेला तर आम्ही माफी मागायचो. एवढ्या चार वर्षात राजकारणाची पातळी खूप घसरली आहे आणि आता त्याने कळस गाठलाय. गिरीश महाजनांच्या वक्तव्यामुळे माझ्या मित्रपरिवारातून फोन येत असून ते तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहेत, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
"चावट शब्द हा खान्देशातील बोलीभाषेतील शब्द आहे. चावट शब्दाचा त्यांनी वेगळा अर्थ काढला, कारण त्यांच्या मनात चांगल्या भावना नसतात. नेहमी इकडे पाहण्याच्या त्यांच्या भावना असता, मात्र तरी पण चावट शब्दाचं त्यांना वाईट वाटलं असेल, तर मी त्यांची माफी मागावी, त्यांनी मला चावट म्हणावं, मी त्यांची माफी मागायला लावणार नाही, असाही टोला एकनाथ खडसे यांनी यावेळी लगावला आहे.
"गिरीश महाजन म्हणतात की जास्त बोलायला लावू नका. मात्र गिरीश महाजन यांना माझे आव्हान आहे, जास्त बोला आणि जे काय असेल ते दाखवा असे आव्हान एकनाथ खडसे यांनी महाजन यांना केले आहे.
महत्वाच्या बातम्या