एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर?; नागपुरात शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता
भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचं बोलंलं जात आहे. तसेच याच पार्श्वभूमीवर खडसे नागपुरात शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊ शकतात, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचं बोलंलं जात आहे. सध्या नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरू असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तिथेच आहेत. काही वेळापूर्वी भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे नागपुरात दाखल झाले असून ते शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून नाराज असलेले खडसे आता भाजपला रामराम करून राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत आहेत.
पाहा व्हिडीओ : एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर?, नागपुरात शरद पवार, उद्धव ठाकरेंना भेटण्याची शक्यता
गोपीनाथ गडावर नुकत्याच झालेल्या मेळाव्यात एकनाथ खडसेंनी व्यासपीठावरुन जाहिररित्या पक्षाप्रती असलेली आपली नाराजी व्यक्त केली होती. भाजप हा आधी शेठजी आणि भटजी पक्ष म्हणून ओळखला जात असे, त्याला गोपीनाथ मुंडे यांनी बहुजनांचा चेहरा दिला. जे 40 वर्ष पक्षासाठी सातत्याने झटले त्यांनाच अशी वागणूक का दिली जाते?, आम्ही बाहेर पडत नाही तर आम्हाला तसं करण्यासाठी प्रवृत्त केलं जात असल्याचंही, एकनाथ खडसेंनी जाहिरपणे म्हटलं होतं. भर मेळाव्यात वस्त्रहरण केल्यानंतर पक्षात आता खडसेंचं पुन्हा पुनर्वसन होणं अशक्य आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी याआधीच शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट घेऊन वेगळा विचार करण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. सूत्रांच्या माहितीनुसार दोन्ही पक्षश्रेष्टींनी एकनाथ खडसेंचं स्वागतच केलं आहे.
दरम्यान, याआधी एकनाथ खडसेंनी दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांना भेटले होते. त्यानंतर त्यांनी मुंबईत येऊन शिवसेना पक्षप्रुमख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या दोन्ही भेटीसाठी त्यांनी जळगाव जिल्ह्यातील एका सिंचन प्रकल्पाचं कारण पुढं केलं होतं. पण भाजपमध्ये सातत्याने अपमान होत राहिल्यास वेगळा विचार करेल, असं म्हणणारे खडसे आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा पार्श्वभूमीवर खडसे नागपुरात शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊ शकतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement