एक्स्प्लोर

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेलांना ईडीची नोटीस, 18 तारखेला चौकशी

जमीन ज्यांच्या नावावर आहे त्या मेमन यांची पार्श्वभूमी व्यवहारापूर्वी आम्ही तपासली होती. त्यामुळे त्यांच्यासोबत व्यवहार केल्याने कायद्याचं उल्लंघन होणार नाही ही खात्री व्यवहाराअगोदर घेतलं असल्यांचं प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केलं.

मुंबई: वरळीच्या सीजे हाऊस इमारतीच्या जमीन व्यवहार घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं नाव प्रकरणात ईडीच्या रडारवर होतं, जे आता जाहीर झालं आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांचंही नाव आता या जमीन व्यवहाराच्या घोटाळ्याप्रकरणात जोडलं गेलं आहे.

प्रफुल पटेलांनी संबंधित करार करताना कोणताही गैरव्यवहार केला नसल्याचं स्पष्ट केलं, ईडीची नोटीस जाहीर झाल्यानंतर पटेल यांची मुंबईत पत्रकार परिषद झाली. ही प्रॉपर्टी हजरा इकबाल मेमन यांची असल्याकारणाने याच्या व्यवहाराचा आमच्याशी संबंध नसल्याचं पटेल यांनी पत्रकारांना सांगितलं.

मेमन यांना 199 साली पासपोर्ट मिळाला आणि त्या युएईला जाऊनही आल्या, हा मुद्दा प्रफुल यांनी मांडला कारण गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास पासपोर्ट आणि प्रवासात अडचणी येतात. मेमन यांची पार्श्वभूमीसुद्धा व्यवहारापूर्वी आम्ही तपासली होती. त्यामुळे त्यांच्यासोबत व्यवहार केल्याने कायद्याचं उल्लंघन होणार नाही ही खात्री आम्ही अगोदरच घेतली होती त्यानंतर कागदावर सह्या केल्या, त्यामुळे आता कोणतंही प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याचा प्रश्न नाही, असं प्रफुल पटेल म्हणाले.

ईडीतर्फे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या एकेकाळी जवळ असलेल्या इकबाल मिर्ची गँगच्या दोन गुंडांना 200 कोटींच्या जमीन व्यवहार प्रकरणात काल अटक करण्यात आली. हारून युसूफ आणि रंजित सिंग बिंद्रा अशी अटक आरोपींची नावं आहेत. ईडीने प्रफुल पटेल यांना ईडीने समन्स बजावलं आहे, चौकशीसाठी 18 ऑक्टोबरला त्यांना ईडी कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. ईडीकडून या जमीन व्यवहाराची पडताळणी केली जात आहे. वरळीच्या सीजे हाऊस इमारतीसाठी मनी लॉंड्रिंग आणि याच्या खरेदीसाठी परदेशी खात्यांचा वापर केला गेला का याची तपासणी सध्या ईडीचे अधिकारी करत आहेत.

ईडीतर्फे मिर्ची गॅंग आणि त्यांच्या अनधिकृत धंद्यांवर सध्या कारवाई सुरु आहे. या कारवाईत ईडीतर्फे इकबाल मिर्ची गँगच्या दोन गुंडांना अटक करण्यात आली. आरोपी रंजित सिंग बिंद्रा याने 200 कोटींच्या जमीन व्यवहारात दलाली केली होती तर हारून युसूफ याने पैसे ट्रान्सफर आणि लॉजीस्टिक्स उपलब्ध करून दिल्याचे तपासात उघड झाले आहे. दोन्ही आरोपी इकबाल मिर्ची गँगचे असून जमीन प्रकरणात दोघांची महत्त्वाची भूमिका होती.

काय आहे प्रकरण ?

मिलेनियम डेव्हलपर्स वरळी येथे सी जे व्यावसायिक इमारत 2006-2007 मध्ये बांधली होती. 2007 मध्ये या इमारतीचा तिसरा आणि चौथा मजला मिर्ची परिवाराला मिलेनियम डेव्हलपर्सकडून देण्यात आला होता. हा व्यवहार संशयास्पद असल्यामुळे ED या प्रकाराची चौकशी करत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; कोर्टातील सुनावणीनंतर मनोज जरागेंचा थेट इशारा
त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; कोर्टातील सुनावणीनंतर मनोज जरागेंचा थेट इशारा
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines 12 PM Top Headlines 12 PM 27 March 2025 दुपारी 12 च्या हेडलाईन्सPrashant Koratkar : Indrajeet Sawant यांना फोन केल्याची प्रशांत कोरटकरची कबुली : सूत्रAnjali Damania : Sudarshan Ghule ला टोळीचा म्होरक्य का दाखवलं जातंय,अंजली दमानियांचा सवालTop 100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 27 March 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; कोर्टातील सुनावणीनंतर मनोज जरागेंचा थेट इशारा
त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; कोर्टातील सुनावणीनंतर मनोज जरागेंचा थेट इशारा
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
Prakash Ambedkar: देवेंद्र फडणवीसांनी भीमा कोरेगावसारखी चूक पुन्हा करु नये, संभाजी भिडेंना तात्काळ जेलमध्ये टाका: प्रकाश आंबेडकर
देवेंद्र फडणवीसांनी भीमा कोरेगावसारखी चूक पुन्हा करु नये, संभाजी भिडेंना तात्काळ जेलमध्ये टाका: प्रकाश आंबेडकर
गेल्यावर्षी भारतात आले, पीएम मोदींसोबत शेकहँड देत फोटोसेशन अन् आता कॅनडातील त्यांच्याच पक्षाने थेटं तिकिट कापलं!
गेल्यावर्षी भारतात आले, पीएम मोदींसोबत शेकहँड देत फोटोसेशन अन् आता कॅनडातील त्यांच्याच पक्षाने थेटं तिकिट कापलं!
मित्रांसोबत आयपीएल मॅच पाहिली, मित्र घरी जाताच एएसआयनं स्वत:च्या डोक्यात सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडली; चाळीस दिवस रजा संपवून हजर झाल्यानंतर कृत्य
मित्रांसोबत आयपीएल मॅच पाहिली, मित्र घरी जाताच एएसआयनं स्वत:च्या डोक्यात सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडली; चाळीस दिवस रजा संपवून हजर झाल्यानंतर कृत्य
चार वर्षापासून प्रेम अन् दोनवेळा गर्भपात केलेल्या गर्लफ्रेंडसोबत तरुणाचं सकाळी कोर्ट मॅरेज अन् संध्याकाळी घरच्यांनी शोधलेल्या मुलीसोबत लग्न; संतापलेल्या गर्लफ्रेंडनं...
चार वर्षापासून प्रेम अन् दोनवेळा गर्भपात केलेल्या गर्लफ्रेंडसोबत तरुणाचं सकाळी कोर्ट मॅरेज अन् संध्याकाळी घरच्यांनी शोधलेल्या मुलीसोबत लग्न; संतापलेल्या गर्लफ्रेंडनं...
Embed widget