एक्स्प्लोर
भुजबळांच्या कंपनीचा संचालक माफीचा साक्षीदार?
मुंबई : पैशांच्या अफरातफरीप्रकरणी तुरुंगावास भोगत असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. कारण अंमलबजावणी संचालनालय भुजबळ यांच्या कंपनीच्या संचालकालाच माफीचा साक्षीदार करण्याच्या तयारीत आहे.
या प्रकरणी ठोस पुरावे मिळवण्यासाठी भुजबळ कुटुंबीयांची मालकी असलेल्या कंपनीच्या एका संचालकालाच माफीचा साक्षीदार करण्याचा निर्णय ईडीने घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
सध्या छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ घोटाळ्याच्या आरोपात आर्थर रोड कारागृहात आहेत. ईडीने त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केल्याने दोघांना जामीन मिळण्याचा मार्ग खडतर बनला आहे. शिवाय दोघांच्या न्यायालयीन कोठडीत 27 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
खरंतर छगन भुजबळ हे 'मुंबई एज्युकेशन ट्रस्ट'चे अध्यक्ष आहेत. या संस्थेतील काही कर्मचाऱ्यांनाच संचालक बनवण्यात आलं, मात्र त्यांना कोणतेही अधिकार दिले नव्हते. ते नाममात्र संचालक होते आणि समीर भुजबळ यांच्या आदेशानुसारच काम करत. त्यामुळे या संचालकांचा प्रत्यक्ष व्यवहाराशी काहीही संबंध नसल्याने त्यांचा जबाब खटल्याच्या वेळी कामी येईल.
ईडीने या संचालकांचा आरोपी म्हणून जबाब नोंदवला असला तरी त्यांना माफीचा साक्षीदार करणार आहे. त्यामुळे त्यांचा जबाब हा भुजबळांविरुद्ध ठोस पुरावा ठरु शकतो, अशी शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement