एक्स्प्लोर
Advertisement
पेण अर्बन बँक घोटाळा : माजी अध्यक्ष आणि संचालकांना बेड्या
पेण अर्बन सहकारी बँकेत आठ वर्षांपूर्वी घोटाळा झाल्याचं उघड झालं होतं.
रायगड : मनी लॉड्रिंगप्रकरणी रायगडमधील पेण अर्बन सहकारी बँक लिमिटेडचे माजी अध्यक्ष आणि माजी संचालकांना अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचलनालयाने शिशिर धारकर (वय 57 वर्ष) आणि प्रवीण कुमार (वय 63 वर्ष) यांना घोटाळ्याप्रकरणी शुक्रवारी (30 नोव्हेंबर) रात्री बेड्या ठोकल्या. पेण अर्बन सहकारी बँकेतील घोटाळ्याचा फटका बँकेच्या सुमारे अडीच लाख ठेवीदारांना बसला.
पेण अर्बन सहकारी बँकेत आठ वर्षांपूर्वी घोटाळा झाल्याचं उघड झालं होतं. बँकेतील गैरव्यवहारप्रकरणी जिल्हा उपनिबंधकांनी नेमलेल्या विशेष लेखा परीक्षण पथकाने 128 खाती बोगस असल्याचं अहवालामध्ये नमूद केलं होतं. शिशिर धारकर आणि प्रवीण कुमार यांनी 128 बोगस कर्ज खात्यांद्वारे 774 कोटींचा घोटाळा करुन ठेवीदारांचे पैसे लुटले होते, असा आरोप आहे.
2001 ते 2010 दरम्यान सुमारे 685 बोगस कर्ज खाती उघडून त्याद्वारे जवळपास 774 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं आतापर्यंतच्या तपासात समोर आलं आहे. शिशिर धारकर आणि प्रवीण शर्मा हे या घोटाळ्याचे प्रमुख सूत्रधार असल्याचं चौकशीमध्ये समोर आलं आहे. या दोघांना पीएमएलए कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे, असं अंमलबजावणी संचलनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement