एक्स्प्लोर
Advertisement
पालघरमध्ये आजवरचा सर्वात मोठा भूकंपाचा धक्का, भिंतींना तडे, विद्यार्थी भयभीत
आजवरचा हा सर्वात मोठा धक्का 4.3 मॅग्नेट्यूट आहे. मागील महिन्यात 4.1 चा धक्का बसला होता. आज बसलेल्या धक्क्याने काही घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. आज दहावीची परीक्षाही सुरू असून काही ठिकाणी विद्यार्थीही भयभीत असल्याची माहिती आहे.
पालघर : पालघर जिल्ह्यात डहाणू, तलासरी तालुक्यात पुन्हा जोरदार भूकंपाचा धक्का बसला आहे. आजवरचा सर्वात मोठा धक्का आहे. यामुळे काही ठिकाणी भिंतींना तडे पडले असून अनेक ठिकाणी भांडी ही खाली पडली. पालघर जिल्ह्यासह गुजरातमधील उंबरगाव, सिल्वासा, वापीही या भूकंपाने हादरले आहे.
VIDEO | पालघरमध्ये वारंवार भूकंपाचे धक्के का जाणवतात | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा
आजवरचा हा सर्वात मोठा धक्का 4.3 मॅग्नेट्यूट आहे. मागील महिन्यात 4.1 चा धक्का बसला होता. आज बसलेल्या धक्क्याने काही घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. आज दहावीची परीक्षाही सुरू असून काही ठिकाणी विद्यार्थीही भयभीत असल्याची माहिती आहे. मध्यरात्रीपासून 5 ते 6 सौम्य धक्के जाणविले गेले असून ते मोजले गेले नाहीत, असं नागरिकांचं म्हणणं आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी भागात मागील फेब्रुवारी महिन्यात 1 तारखेला शुक्रवारी जवळजवळ 16 भूकंपाचे धक्के एकापाठोपाठ एक भूकंपाचे जाणवले होते. त्यातील 6 भूकंपाची धक्क्याच्या नोंदी 3.0 च्या मॅग्निट्यूट झाल्या होत्या. मात्र ह्यामधील 4.1 मॅग्निट्यूट चा सर्वधिक क्षमतेचा भूकंपाची नोंद फेब्रुवारी महिन्यात झाली होती. त्यानंतर मार्च महिन्याच्या पहिल्याच तारखेला पुन्हा जोरदार भूकंपाचा धक्का जाणवला आहे. इंडियन मेट्रोलॉजीकल विभागामार्फत 4.3 मॅग्निट्यूट इतक्या भूकंपाची नोंद झाल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारीच्या 1 तारखेला जेव्हा भूकंपाचा धक्के जाणवले तो दिवस ही शुक्रवार होता आणि पुन्हा एक महिन्यानंतर म्हणजेच 1 मार्च रोजी ही शुक्रवार आहे. यामुळे शुक्रवार हा भूकंपवार ठरू पाहत आहे.
शुक्रवारी मध्यरात्री एक वाजेपासून जवळ जवळ 6 मध्यम स्वरूपाचे धक्के बसले त्यानंतर मात्र अकरा वाजून 14 मिनिटाला आतापर्यंत सर्वाधिक क्षमतेचा 4.3 पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी भागात मागील नव्हेंबर महिन्यापासून एका पाठोपाठ वारंवार सौम्य-मध्यम स्वरूपाचे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. या भूकंपाच्या तीव्रतेच्या नोंदीनुसार गुजरात राज्यातील उंबरगाव, संजान, वापी तसेच केंद्रशासित प्रदेशातील सेलवासपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती आहे. त्याच प्रमाणे पालघर जिल्ह्यातील डहाणू ,तलासरी, पालघर, बोईसर, केळवे, सफाळे, विक्रमगड ,जव्हार भूकंपाचे धक्के जाणवल्याने भूकंपाचा विस्तार वाढीस लागल्याचे जाणवू लागले आहे.
जिल्ह्याच्या डहाणू आणि तलासरी तालुक्यातील काही गावांमध्ये मागील काही दिवसांमध्ये जाणवत असलेल्या भूकंपाच्या धक्यांमुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून रहिवाशांनी घराबाहेर झोपण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. यादृष्टीने त्यांच्या सोयीसाठी तात्पुरती उपाययोजना म्हणून एनडीआरएफचे तंबू मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात आली असून शनिवारी या तंबूंचे संबंधित ग्रामपंचायतींना वितरण करण्यात आले आहे. त्या प्रमाणे 42 ठिकाणी 200 तंबू उभारण्यात ही आले आहेत.
VIDEO | पालघर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, घाबरुन घराबाहेर पळताना चिमुकलीचा मृत्यू | एबीपी माझा
डहाणू आणि तलासरी तालुक्यातील भूकंपाचे धक्के जाणवत असलेल्या भागात रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे हे स्वत: यावर लक्ष ठेवून आहेत. सर्व संबंधित यंत्रणांना दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले असून कोणीही अफवा पसरवू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन डॉ.नारनवरे यांनी केले आहे.
पालघरमधील भूकंपाचा आतापर्यंतचा घटनाक्रम
- 11 नोव्हेंबर - 3.2 रिश्टर स्केल
- 24 नोव्हेंबर - 3.3 रिश्टर स्केल
- 1 डिसेंबर - 3.1 आणि 2.9 रिश्टर स्केल
- 4 डिसेंबर - 3.2 रिश्टर स्केल
- 7 डिसेंबर - 2.9 रिश्टर स्केल
- 10 डिसेंबर - 2.8 व 2.7 रिश्टर स्केल
- 20 जानेवारी - 3.6 रिश्टर स्केल
- 24 जानेवारी - 3.4 रिश्टर स्केल
- 1 फेब्रुवारी - 3.3, 3.5, 3.0, 4.1 रिश्टर स्केल
संबंधित बातम्या
पालघर भूकंप : एनडीआरएफची दोन पथकं पोहोचली, नागरिकांमध्ये जनजागृती करणार
पालघर भूकंप : आरोग्य विभागासह एनडीआरएफला पाचारण
पालघरमध्ये भूकंपाचे धक्के, चिमुकलीचा मृत्यू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement