एक्स्प्लोर
गूढ आवाजाने पालघर जिल्ह्यात गावे हादरली, नागरिक भयभीत
रविवारी पुन्हा गूढ आवाज होऊन जमीनीला हादरा बसल्याच्या घटनेने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. दरम्यान 3.2 रिश्टरस्केलचा भूकंप मोजला गेला असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. काही ठिकाणी जमीन हादरल्याच्या तर काही ठिकाणच्या घरांच्या भिंतीला तडे गेले आहेत. याआधी 3 नोव्हेंबर रोजी गूढ आवाजाने हा परिसर हादरला होता.
![गूढ आवाजाने पालघर जिल्ह्यात गावे हादरली, नागरिक भयभीत Earthquake In Palghar District, Citizens frightened गूढ आवाजाने पालघर जिल्ह्यात गावे हादरली, नागरिक भयभीत](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/11/11211732/IMG-20181111-WA0037.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पालघर : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी, चिंचले, हळदपाडा, दपचारी, सांसवंद, आंबोली, वरखंडा, वकास तर तलासरी तालुक्यातील तलासरी, वडवली, कवाडा, सवणे, कुर्झे, वसा, कारजगाव इत्यादी गावात रविवारी पुन्हा गूढ आवाज होऊन जमीनीला हादरा बसल्याच्या घटनेने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. दरम्यान 3.2 रिश्टरस्केलचा भूकंप मोजला गेला असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. काही ठिकाणी जमीन हादरल्याच्या तर काही ठिकाणच्या घरांच्या भिंतीला तडे गेले आहेत. याआधी 3 नोव्हेंबर रोजी गूढ आवाजाने हा परिसर हादरला होता.
काही ठिकाणी हादऱ्याने घड्याळं, भांडी, कपाटं खाली पडली तर खिडक्या, दरवाज्यांचा देखील झटक्याने आवाज झाल्याचे नागरिकांनी सांगितले. गूढ आवाज होऊन जोरदार झटका बसल्याने भूकंप झाल्याच्या भीतीने नागरिक घराबाहेर पडले. या गूढ आवाजाने नागरिकांच्या मनात घर केले आहे.
याआधी 3 नोव्हेंबर रोजी गूढ आवाजाने हा परिसर हादरला होता. त्यानंतर रविवारी संध्याकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी गूढ आवाज होऊन जमिनीला हादरे बसल्याने दहा दिवसांत ही दुसरी घटना घडल्याने नागरिक भयभीत झाले आहे. मात्र हा भूकंप होता की, आणखी स्फोटाचा आवाज होता याचे कारण कळू शकले नाही.
दीड महिन्यापूर्वीही अशाच प्रकारे गूढ आवाज येऊन जमिनीत कंपन झाले होते. त्यानंतर शनिवारी 3 नोव्हेंबर रोजी दोन झटके बसले होते. त्यानंतर आज पुन्हा गूढ आवाज येऊन जमिलीला हादरे बसले. दीड महिन्यात ही तिसरी घटना घडल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)