एक्स्प्लोर

वेळेवर पगार न झाल्याने एसटी चालक तरुणाची आत्महत्या; आजी-आजोबांवर नातवाला सांभाळण्याची वेळ

वेळेवर पगार न झाल्याने एसटी चालक तरुणाने टोकाचं पाऊल उचलल्याची घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. या घटनेमुळे आता म्हातारपणी आजी-आजोबांवर नातवाला सांभाळण्याची वेळ आली आहे.

बीड : एकतर जास्तीचे काम आणि त्यातही तुटपुंजा पगार आणि तोही वेळेवर मिळत नसल्याने राज्यभरातील एसटी कर्मचारी आर्थिक संकटात सापडलेत. डोक्यावर कर्जाचा बोजा आणि त्यात पगार वेळेवर न झाल्याने बीडमधल्या तरुण ड्रायव्हरने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. तुकाराम सानप असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ते बीड जिल्ह्यातील शिरूरच्या तागडगाव येथील आहेत. एकुलत्या एक तरुण मुलाने आपलं आयुष्य संपवल्याने म्हातारपणी आजी आजोबांवर आता नातवाला सांभाळण्याची वेळ आलीय. याला कारण ठरलाय एसटीचा वेळेवर ना होणार पगार. 

मागच्या दहा वर्षांपासून तुकाराम सानप एसटीमध्ये चालक म्हणून काम करत होते. पत्नी आणि  दोन चिमुकल्यांसह ते बीड शहरातील अंकुष परिसरामध्ये स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहत होते. या महिन्यात पगार झाला नाही आणि त्यात लाईटचे बिलसुद्धा भरले नव्हते म्हणून या घरात मागच्या पंधरा दिवसापासून अंधार होता.

2011 साली नोकरीवर लागलेल्या तुकाराम सानप यांना सध्या 17 हजार 500 रुपये पगार होता. तुकाराम सानप यांच्यावर एसटी खात्याअंतर्गत बँकेचे पाच लाख रुपयांचे कर्ज होते. बीड शहरामध्ये घेतलेल्या एका फ्लॅटवर सहा लाख रुपयाचे गृहकर्ज होते. दोन्ही कर्जाची मिळून पंधरा हजार रुपये महिन्याला कर्जाचा हप्ता जायचा. कोरोनामुळे कित्येक महिने एसटी जागची हलली नाही. त्यानंतर सुरू असलेली एसटी आणखी म्हणावी अशी रुळावर आली नाही. हे जरी खरं असलं तरी ज्या शिलेदारांनी महाराष्ट्राची लालपरी गावागावात पोहोचवली त्यांना मात्र आता आधाराची गरज आहे.

काही दिवसांपूर्वीच संगमनेर मुक्कामी आलेल्या बसमध्येच चालकाने गळफास घेतला होता
काही दिवसांपूर्वी संगमनेर शहरातील बस स्थानकात उभ्या असलेल्या रिकाम्या बसमध्ये गळफास लावून घेत बसचालकाने आत्महत्या केली होती. 50 वर्षीय सुभाष शिवलिंग तेलोरे हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोल्हार कोलूबाईचे रहिवासी होते. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे त्यांच्या जवळ आढळून आलेल्या चिठ्ठीवरून दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले असून चिठ्ठीत कोणाचेही नाव अगर कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचेही त्यांनी नमूद केलय.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
Jayant Patil : बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रियाताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रियाताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Aaditya Thackeray Majha Vision 2024 : मनसेसह युती करण्यात नातं आडयेतं? काकाबद्दल आदित्य म्हणतात..TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 06 PM : 14 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 14 May  2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सAaditya Thackeray Majha Vision : राज ठाकरेंसह युती का होत नाही? आदित्य ठाकरे पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
Jayant Patil : बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रियाताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रियाताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
Jayant Patil : पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
Marathi Serial Updates Zee Marathi :  'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या'  अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या' अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
Embed widget