Devendra Fadnavis : "अतिवृष्टीमुळे पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान, शेतकऱ्यांना लवकरच मोबदला मिळेल'' फडणवीसांची माहिती
Devendra Fadnavis : "शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतकऱ्यांना लवकरच मोबदला मिळेल यासाठी प्रयत्न" असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
Devendra Fadnavis : गेल्या काही दिवसांच्या अतिवृष्टीमुळे पूर्व विदर्भात (Vidarbha) तब्बल 1 लाख 35 हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतीचा नुकसान झाल्याचा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते काल पूर्व विदर्भातील वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या पूर पाहणी दौऱ्याच्या नंतर नागपुरात प्रशासनाची आढावा बैठक घेतल्यानंतर बोलत होते.
कमी दिवसांमध्ये जास्त पाऊस झाल्यामुळेच शेतीचे नुकसान - फडणवीस
पूर्व विदर्भात जून आणि जुलैच्या सरासरी पेक्षाही 120 ते 190 टक्के पाऊस पडला असून कमी दिवसांमध्ये जास्त पाऊस झाल्यामुळेच शेतीचा जास्त नुकसान झाल्याचे फडणवीस म्हणाले. काही ठिकाणी 100 टक्क्यांपर्यंत नुकसान झाले असून बहुतांशी ठिकाणी दुबार पेरणी ही शक्य नाही. एका अंदाजा प्रमाणे शेतीचा नुकसान झालेल्या भागातील फक्त 35 टक्के ठिकाणीच पुन्हा पेरणी करता येणार आहे. त्यामुळे उर्वरित ठिकाणी या हंगामात पुन्हा पेरणी शक्य नाही असे फडणवीस म्हणाले.
पूरग्रस्त भागात तातडीची खावटी मदत देणे सुरू
पूरग्रस्त भागात तातडीची खावटी मदत देणे सुरू केले आहे. काही ठिकाणी ती सुरु झाली आहे. तर उर्वरित ठिकाणी लवकर सुरू होईल. मागील सरकारच्या काळातील नुकसानीचे पैसे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना अजून मिळालेले नाही. मात्र यंदाचे सर्वेक्षण गांभीर्याने करून नुकसान भरपाई लवकर मिळावी असे प्रयत्न राहील. मात्र, ती किती राहील हे पूर्ण राज्याच्या स्थितीचा आकलन केल्यानंतरच ठरविले जाईल असे ही फडणवीस म्हणाले.
शेतकऱ्यांना लवकरच मोबदला मिळेल यासाठी प्रयत्न - फडणवीस
पूरग्रस्त भागाचा दौरा आटपून फडणवीस काल नागपुरातील विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचले. यावेळी त्यांनी प्रशासनासोबत पूर्व विदर्भातील पूर परिस्थितीचा आढावा घेत केलेल्या आणि करावयाच्या उपायोजना संदर्भात बैठक घेतली."शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतकऱ्यांना लवकरच मोबदला मिळेल यासाठी प्रयत्न" असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
इतर महत्वाच्या बातम्या
Todays Headline 20th July : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या
Mumbai : कॅबिनेट मंत्रीपद मिळवून देण्यासाठी आमदारांकडे 100 कोटी रुपयांची मागणी, 4 जणांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई
Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कोकणातील रिफायनरी विरोधकांचे पत्र; "कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास जबाबदारी तुमची''