एक्स्प्लोर
151 तालुक्यांव्यतिरीक्त 250 मंडळात दुष्काळ जाहीर
151 तालुक्यांव्यतिरीक्त ज्या महसुली मंडळांमध्ये 700 मिमी किंवा 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला तिथेही आज दुष्काळ जाहीर करण्यात आला. केंद्राकडे सादर केलेल्या व्यतिरिक्त ज्या महसुली मंडळांमध्ये 700 मिमी किंवा 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला ते दुष्काळी म्हणून जाहीर करायचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
![151 तालुक्यांव्यतिरीक्त 250 मंडळात दुष्काळ जाहीर Drought condition declared in 250 Mandals also 151 तालुक्यांव्यतिरीक्त 250 मंडळात दुष्काळ जाहीर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2015/12/29115402/dushkal.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राज्य सरकारने केंद्र सरकारच्या दुष्काळ मॅन्युअलनुसार आज राज्यातल्या आणखी 250 मंडळात दुष्काळ जाहीर केला. काल रात्री सरकारने 151 तालुक्यात गंभीर आणि मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला होता.
या 151 तालुक्यांव्यतिरीक्त ज्या महसुली मंडळांमध्ये 700 मिमी किंवा 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला तिथेही आज दुष्काळ जाहीर करण्यात आला. केंद्राकडे सादर केलेल्या व्यतिरिक्त ज्या महसुली मंडळांमध्ये 700 मिमी किंवा 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला ते दुष्काळी म्हणून जाहीर करायचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
या संदर्भात समिती गठीत करून दुष्काळासंदर्भात तक्रारी, तांत्रिक बाबी आणि अडचणी विचारात घेतल्या जातील. निकषात बसले तर आणखी तालुके आणि मंडळांचा समावेश दुष्काळ यादीत केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
राज्यातील 26 जिल्ह्यांमधल्या 151 तालुक्यांमध्ये राज्य सरकारकडून काल दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. 112 तालुक्यांमध्ये गंभीर स्वरुपाचा, तर 39 तालुक्यांत मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झाला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरला, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र आणि पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करुन या घटकांनी प्रभावित झालेल्या तालुक्यांमध्ये आपत्तीची शक्यता विचारात घेऊन राज्य शासन परिशिष्ट 'अ' मध्ये नमूद केलेल्या 151 तालुक्यांमध्ये त्यांच्या नावासमोर दर्शवल्याप्रमाणे गंभीर/मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे.
गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झालेले तालुके (112)
सांगली (5) : जत, कवठेमहांकाळ, खानापूर-विटा, आटपाडी, तासगांव
सातारा (1) : माण-दहीवडी
सोलापूर (9) : करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढे, पंढरपूर, सांगोले, अक्कलकोट, मोहोळ, दक्षिण सोलापूर
पालघर (3) : पालघर, तलासरी, विक्रमगड
धुळे (2) : धुळे, सिंदखेडे
जळगाव (13) : अमळनेर, भडगांव, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, पारोळा, रावेर, यावल
नंदुरबार (3) : नंदुरबार, नवापूर, शहादा
नाशिक (4) : बागलान, मालेगांव, नांदगांव, सिन्नर
अहमदनगर (11) : कर्जत, अहमदनगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, रहाता, रोहुरी, संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा, जामखेड
औरंगाबाद (9) : औरंगाबाद, गंगापूर, खुलताबाद, पैठण, फुलंब्री, सिल्लोड,सोयगाव, वैजापूर, कन्नड
बीड (11) : आष्टी, बीड, धारुर, गेवराई, माजलगाव, शिरुर (कासार), वडवणी, केज, आंबेजोगाई, परळी, पाटोदा,
जालना (7) : अंबड, बदनापूर, भोकरदन, घनसांगवी, जाफ्राबाद, जालना, परतूर
नांदेड (2) : मुखेड, देगलूर
उस्मानाबाद (7) : लोहारा, कळंब, उस्मानाबाद, परांडा, तुळजापूर, वाशी, भूम
परभणी (6) : मनवथ, पाथरी, सोनपेठ, पालम, परभणी, सेलू
हिंगोली (2) : हिंगोली, सेनगाव
अमरावती (1) : मोर्शी
बुलडाणा (7) : खामगाव, लोणार, नांदुरा, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, सिंदखेड राजा
यवतमाळ (6) : बाभुळगाव, दारव्हा, कळंब, महागाव, उमरखेड, राळेगाव
चंद्रपूर (1) : चिमूर
नागपूर (2) : काटोल, कळमेश्वर
मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झालेले तालुके (39)
पुणे (7) - आंबेगाव, पुरंदर, सासवड, वेल्हे, बारामती, दौंड, इंदापूर, शिरुर-घोडनंदी
सातारा (2) - कोरेगांव, फलटण
धुळे (1) - शिरपूर
नंदुरबार (1) - तळोदे
नाशिक (4) - देवळा, इगतपुरी, नाशिक, चांदवड
नांदेड (1) - उमरी
हिंगोली (1) - कळमनुरी
लातूर (1) - शिरुर अनंतपाळ
अकोला (5) - बाळापूर, बार्शिटाकळी, मुर्तिजापूर, तेल्हारा, अकोला
अमरावती (4) - अचलपूर, चिखलदरा, वरुड, अंजनगांव सुर्जी
बुलडाणा (1) - मोताळा
वाशिम (1) - रिसोड
यवतमाळ (3) - केलापूर, मारेगांव, यवतमाळ
चंद्रपूर (4) - ब्रम्हपुरी, नागभिर, राजुरा, सिंदेवाही
नागपूर (1) - नरखेड
वर्धा (2) - आष्टी, कारंजा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
ठाणे
क्राईम
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)